लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : कपडे धुण्यासाठी कृष्णा नदीत उतरलेले पाच परप्रांतीय कामगार बुडाल्याची घटना गुरूवारी मिरजेतील कृष्णा घाट येथे घडली. यापैकी तिघांना वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला तर एकजण अद्याप बेपत्ता आहे.

Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Tehsil Office Tehsildar Sachin Shankarlal Jaiswal of Sindkhedaraja arrested for accepting bribe
तहसीलदाराकडे सापडले तब्बल ४६ लाखांचे घबाड! लाच स्वीकारतांना अटक

मिरज-मालगाव रस्त्यावरील दत्तनगर येथे भाड्याने वास्तव्यास असलेले राजस्थानमधील फरशी बसविण्याचे काम करणारे सहा कामगार कपडे धुण्यासाठी कृष्णा घाटावर गेले होते. यापैकी पाच जण पाण्यात उतरले होते. कपडे धूत असताना यापैकी पाच जण पाण्यात बुडाले. बुडालेल्यापैकी तिघांना वाचविण्यात ओम पाटील या तरूणाला यश आले. मात्र, रामस्वरूप यादव (वय २३) आणि जितेंद्र यादव (वय २१) हे दोघे वाहत्या पाण्यात बेपत्ता झाले.

आणखी वाचा-अनाथ मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षे सक्तमजुरी 

सदरची घटना समजताच महापालिकेचे अग्निशमन दल, आयुष सेवा भावी संस्था व वजीर बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शोध पथकाला रामस्वरूप यादव याचा मृतदेह हाती लागला असून दुसरा बेपत्ता झालेला जितेंद्र यादव मात्र अद्याप हाती लागलेला नाही.