Uddhav Thackeray Government Updates: राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे. महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेची याचिका फेटाळली असून उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावर स्थगिती आणण्यास नकार दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिल्यानंतर शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम याचिका करत तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. यानंतर सुप्रीम कोर्टाने संध्याकाळी ५ वाजता याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल साडे तीन तास सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरु होता. यानंतर ९ वाजता सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रीम कोर्टानं हा निकाल सुनावल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी मोठी घोषणाबाजी केली आहे. त्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या आहेत. त्यांचा घोषणाबाजी करतानाचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शेअर केला आहे.