सांगलीतील वाळवा तालुक्यातील पोखर्णी येथे पूनर्वसित झोळंबी वसाहतीमधील जमीन सपाटीकरण कामात बनावट शिक्के व स्वाक्षर्‍या करून वरिष्ठांची फसवणूक केल्या प्रकरणी शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांना निलंबित करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक सुयोग औंधकर यांनी याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा- SC Hearing on Maharashtra Politics: “सरकार अस्तित्वात असताना एखादा गट आघाडीत…”, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी!

वनक्षेत्रपाल जाधव यांनी पोखर्णी (झोळंबी वसाहत) येथील जमिन सपाटीकरणासाठी सुमारे ५८ लाख रूपयांची बनावट कामे करून निधी हडपण्याचा डाव औंधकर यांनी माहिती अधिकारामध्ये उघडकीस आणला होता. या कामाची अंदाजपत्रके तयार करून तांत्रिम मान्यता वारणा कालवे विभागाकडून घेणे आवश्यक होते. जाधव यांनी उप अभियंत्यांची मान्यता असलेले पत्र बनावट शिक्का व स्वाक्षरी करून अंदाजपत्रकासोबत जोडले होते. ही बाब माहिती अधिकारामध्ये स्पष्ट झाली.

हेही वाचा- शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले; “त्यांचा निर्णय अत्यंत….”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत औंधकर यांनी वन विभागाच्या वरिष्ठांकडे कागदपत्रासह पाठपुरावा केला. वारणा कालवे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून या कामांना तांत्रिक मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे वनक्षेत्रपाल जाधव यांनी खोटी कागदपत्रे सादर करून वरिष्ठांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश श्रीमती कट्टे यांनी दिले. निलंबनाच्या कालावधीत त्यांना कुपवाड येथील कार्यालयात दैनंदिन हजेरी देण्याचेही सांगण्यात आले.