मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे काही महिन्यांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीच्या रडावर असून, देशमुख यांच्या मालमत्तांची झाडाझडतीही ईडीकडून केली जात आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली असून, रविवारीही त्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले. अनिल देशमुख यांना आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आलेलं आहे. मात्र, तीनही वेळा अनिल देशमुख यांनी चौकशीला जाणं टाळलं. मागील आठवड्यात बजावण्यात आलेल्या समन्सपासून देशमुख नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचा शोध ईडीकडून घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या पत्नी व मुलालाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे.आता अनिल देशमुख यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी आपली बाजू मांडली आहे. तसेच ईडीसमोर कधी हजर होणार याबाबतही खुलासा केला आहे.

“ईडीने माझ्या कुटुंबियांची ४ कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. चार कोटींच्या जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये माझा मुलाने २ कोटी ६७ लाखामध्ये २००६ मध्ये जी जमीन घेतली होती. ती २ कोटी ६७ लाखाची जमीन सुद्धा जप्त केलेली आहे. मात्र ३०० कोटीची असल्याचं सांगून काही जण गैरसमज पसरवत आहेत. मला ईडीचा समन्स आला होता. समन्स आल्यानंतर मी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. कोर्टाचा जो काही निकाल येईल. त्यानंतर मी ईडीसमोर माझं स्टेटमेंट देईन”, असा खुलासा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

kerala politics rahul gandhi
“राहुल गांधींचा ‘डीएनए’ तपासायला हवा, ते गांधी असण्याबद्दल संशय”, केरळमधील नेत्याची टीका
nagpur, Anurag Thakur, Criticizes Congress, india alliance leaders no trust, no trust on rahul gandhi, rahul gandhi s leadership, bjp, lok sabha 2024, nda, election 2024,
“राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही,” अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसमध्ये…”
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
Shiv Sena Thackeray group leader Anil Parab
“रामदास कदमांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत जमीन घोटाळा केला…”; अनिल परब यांचा आरोप, म्हणाले, “किरीट सोमय्यांकडे…”

अधिवेशनाच्या एक दिवस आधी पेगॅससचा रिपोर्ट येणं योगायोग तर नाही; IT मंत्र्यांनी व्यक्त केली शंका

अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून वसुली करण्याचं टार्गेट पोलिसांना दिलं होतं, असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीही एनआयए न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात हा आरोप केला होता. त्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या प्रकरणाचा सीबीआयकडूनही तपास केला जात आहे.