रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत डावोसला उद्योगपतींशी चर्चा करायची सोडून गद्दारीची भाषा करत आहेत, या पेक्षा दुर्दैव काय आहे. आता गद्दारांचे दिवस संपत आलेत, कारण भाजप नेत्यांनी त्यांना जागा दाखवायला सुरवात केली असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राउत यांनी केली आहे.

रत्नागिरी संपर्क कार्यालयात विनायक राऊत यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना राऊत म्हणाले, उद्योगमंत्री उदय सामंत हे राज्याला मिळालेत पण ते दुर्दैव आहे. ज्या विषयासाठी डावोसला गेलेत, त्या विषयावर बोलायचे सोडून ते गद्दार किती होते, बेइमानीला आपण किती खतपाणी घालतोय अशी दुहेरी स्वप्न पाहताहेत. अशा उद्योगमंत्र्यांच्या बुद्धीची कीव करावीसी वाटत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

आणखी वाचा-Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

राज्य सरकाराच्या खर्चाने दौरे करताय तर त्या पैशांचा विनियोग करायचा असेल तर राज्याच्या हिताच्या दृष्टीने तेथे चर्चा करावी. पण तेथे जाऊन पक्ष फोडायची भाषा करू नये. कारण आता शिंदे गद्दारांचे दिवस संपत आलेत. भाजपाने त्यांची जागा दाखवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता सुध्दा दोन पालकमंत्री पदांना स्थगिती देऊन भाजपाने जे हवे ते केले आहे. यांना आता काडीमात्र किंमत देत नसल्याची खिल्ली विनायक राऊत यांनी उडवली आहे.

संजय राऊत खरं बोलले आहेत, आता शिंदेंची जागा उदय सामंत घेत असल्याची जोरदार चर्चा होत असल्याच्या विषयावर राऊत यांनी गुगली टाकली आहे. उदय सामंत यांची त्यामध्ये मास्टरकी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत हे जे बोलले आहेत, त्यात तथ्य आहे. कारण काही दिवसांतच १०० टक्के खरं आहे ते समोर येईल, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.

आणखी वाचा-Ajit Pawar On MSRTC : एसटीच्या तिकीट दरात वाढ होणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते म्हणाले,रत्नागिरीत १७ हजार कोटींचा प्रकल्प येणार असे सामंत म्हणत आहेत. पण तो प्रकल्प येईल न येईल ते आता सोडून द्या, कारण रत्नागिरी विमानतळ करता करता ते थकून गेलेत असाही टोला राऊत यांनी लगावला. केवळ आणि केवळ बतावण्या करायाच्या, थापा मारायच्या यापलीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय केले हे दाखवून देण्याची आवश्यकता असल्याचे राऊत यांनी सांगितले.