सांगली : पंढरपूरहून देवदर्शन करून गावी परतत असताना मोटार रस्त्याकडेच्या खड्ड्यात उलटून झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. हा अपघात खानापूर तालुक्यातील खंबाळे या गावी मध्यरात्री सव्वादोन वाजणेच्या सुमारास झाला असल्याची माहिती विटा पोलीस ठाण्यातून बुधवारी देण्यात आली.

खंबाळे (ता. खानापूर) गावच्या हद्दीत वॅगनर मोटार (एमएच ०४ ईटी ८२९७) रस्त्याकडेला उलटून हा अपघात घडला. अपघातात मोटारीतून प्रवास करत असलेले बाळासाहेब जगताप (वय ७३), दिनकर चव्हाण (वय ६२), बाळकृष्ण लोखंडे (वय ६०) आणि कृष्णा शेळके (वय ६२) हे चौघेजण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिसांनी रुग्णवाहिकेतून चौघांना विटा येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. या ठिकाणी प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना आज सकाळी कराडमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातग्रस्त मोटारीचेही मोठे नुकसान झाले असून, अपघातग्रस्त तांबवे (ता. वाळवा) येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौघेजण पंढरपूर येथून देवदर्शन करून गावी परतत असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.