आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरकन्हार येथे होळीनिमित्त खेळल्या जाणाऱ्या मुलाख खेड सुरू होते. पीडित १४ वर्षीय मुलगी, आरोपी शुभंम कमलचंद मेश्राम (१७) व सोनु उर्फ खेमराज शरणागत (२१) हे एकमेकांचे शेजारी असलेल्या तिघांनीही या खेळात सहभाग घेतला. खेळ संपल्यावर रात्री ११ वाजताच्या सुमारास हे तिघेही घराकडे जाण्यास निघाले. यादरम्यान मुलगी लघुशंकेकरिता गेली असता दोन्ही आरोपींनी मुलीचे तोंडू दाबुन तिला जबरदस्तीने सोने शरणागत यांच्या आजोबाच्या घरातील पडवीत घेऊन नेऊन आळीपाळीने बलात्कार केला, तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, मुलीने या अत्याचाराची माहिती घरच्यांना दिल्यावर घरच्यांनी आमगाव पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुभंम मेश्राम याला अटक केली असून, दुसऱ्या आरोपींचा शोध सहायक पोलिस सचिन पवार करीत आहेत.