Gautami Patil Reaction on Badlapur Case : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांच्या अनेक घटना समोर येत आहेत. विनयभंग, अत्याचार, बलात्कारासारख्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी तर बदलापूरकरांनी संपूर्ण राज्य सरकारच वेठीस धरले होते. याप्रकरणी आता चौकशी सुरू झाली असून रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, या सर्व प्रकरणांवर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे. दहीहंडी निमित्ताने ती काल (२७ ऑगस्ट) विविध कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी माध्यमांनी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

राज्यातील विविध भागात सातत्याने महिला अत्याचारची प्रकरणे समोर येत असल्याने गौतमी पाटीलने चिंता व्यक्त केली आहे. “गेल्या आठवडाभर हे सुरू आहे. पोरींनो सुरक्षित राहा. लहानांपासून मोठ्या मुलींपर्यंत सर्वांनी सुरक्षित राहा. सध्या जे घडतंय त्यावरून तरी लहान मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींना जपावं”, असं गौतमी पाटील म्हणाली.

हेही वाचा >> लोककलावंत गणेश चंदनशिवेंची खंत, “लावणी गौतमी पाटीलमुळे भ्रष्ट झाली, नखशिखांत शृंगाराने…”

गौतमी पाटील हिची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. तिच्या नृत्याचे असंख्य चाहते असल्याने अनेक दहीहंडी आयोजकांनी तिला आमंत्रित केलं होतं. मागाठाण्यातील प्रकाश सुर्वेंच्या हंडीलाही ती हजर राहिली होती. तर, ठाणे, नवी मुंबईतील विविध दहीहंडी कार्यक्रमांना ती गेली. या कार्यक्रमांत जबरदस्त नृत्य सादर करून तिने गोविंदा पथकांचं मनोरंजन केलं. यावेळी तिच्या ब्लाऊजची सर्वाधिक चर्चा होती. ब्लाऊजच्या मागच्या बाजूला राधा-कृष्णाची प्रतिमा विणण्यात आली होती. तिने जिथे जिथे उपस्थिती लावली तिथे तिने माध्यमांशी संवाद साधला. “हे माझं मुंबईतलं दुसरं वर्ष असून मुंबईकरांनी मला खूप प्रेम दिलंय”, असं ती म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौतमी पाटीलला जामीन मंजूर

अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवर दोन आठवड्यांपूर्वी मृत्युंजय प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र तरीही हा कार्यक्रम घेतल्यामुळे पोलिसांनी आता गौतमी पाटील, तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात आणि कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत, यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रस्त्यात अडथळा निर्माण होईल असा कार्यक्रम घेणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादवी कलम १८८,२८३,३४१, ३४ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम २,१५ आणि ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० चे कलम ३,४,५, ६ आणि मु.पो.का.क ३७ (१) (२)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात गौतमी पाटीलला जामीन मंजूर झाला आहे.