म्हसळा तालुक्यातील फळसप येथील श्री सोमजाई जाखमाता सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट आयोजित गावदेवी मातेच्या यात्रेचा सुवर्ण महोत्सव सोहळा १७ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. या वेळी विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त चेअरमन भास्कर विचारे यांनी दिली. पालखी व मिरवणूक काढण्यात येणार आहे. सुवर्ण महोत्सव सोहळा व सत्कार समारंभ होणार आहे.