कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज धुळ्यामध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळी समाजाची सभा पार पडली. या सभेतून शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली. राज्यात विविध जमातींच्या विविध प्रश्नांवरती शरद पवारांनी घाण आणि नीच राजकारण केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नांवर आदिवासी विकास मंत्रीच गौडबंगाल करत असल्याचा घणाघाती आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. त्यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर निशाणा साधत घरचा आहेर दिला. आदिवासी जमातीसह ३३ जमातींवरती अन्याय करायला पवारांनी काही लोकांना जवळ ठेवलं होतं. संबंधित लोक आदिवासी जमातीचेच होते, असा दावाही पडळकरांनी केला.

Sunetra Pawar campaign started at Maruti Mandir in Kanheri in Baramati.
विकास त्यांनीच केला काय? बारामतीमधील कामांवरून अजित पवार यांचा सवाल; शरद पवार यांच्यावर टीका
Sharad Pawar Answer to Ajit Pawar
शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर, “घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते, कारण..”
What Sharad pawar Said?
शरद पवारांचं भाषण चर्चेत! सुप्रिया सुळेंच्या लग्नाची गोष्ट, कान तुटलेल्या कपातून चहा, अजित पवारांवर तुफान टीका
what kirit somaiya Said?
“..तर ठाकरे-पवारांनी भाजपा संपवली असती”, किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट

हेही वाचा- “काही नॉटी मुलं…”, फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंची टोलेबाजी!

धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे लोकही शरद पवारांच्या जवळचेच होते. या सर्वांचा सूत्रधार एकच आहे. म्हणून मी नेहमी पवारांवर बोलतो. शरद पवारांनी आधीपासूनच घाण आणि नीच काम केलं आहे, अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं. शिंदे-फडणवीस सरकार पडणार, असे म्हणणाऱ्या विरोधकांवरही गोपीचंद पडळकर टीका केली. शरद पवार आणि संजय राऊत या जीर्ण झालेल्या फाटक्या नोटा आहेत. या चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. शिंदे-फडणवीस सरकार एकदम मजबूत आहे, असंही ते म्हणाले.

हेही वाचा- “शरद पवारांचं राजकारण गद्दारीशिवाय…”, फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल!

फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेल्या गौप्यस्फोटावर भाष्य करताना पडळकर म्हणाले की, शरद पवारांचा चेहरा आधीच विश्वासघाताने, गद्दारीने आणि पाठीत खंजीर खुपसण्याने काळवंडला होता. मागच्या महिन्यामध्ये त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यावर शिक्कमोर्तब केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एकच वाक्य बोलल्यानंतर शरद पवारांचा चेहरा आता डांबरासारखा काळा झाला आहे, अशा शब्दांत गोपीचंद पडळकरांनी टीका केली.