पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत पुढील महिन्यात ‘निळवंडे’चे उद्घाटन

नगर : माफियाराज संपवण्यासाठी यापुढे वाळू-खडीचे लिलाव-ठेकेदारी बंद करून सरकारच वाळूचे डेपो लावून ऑनलाइन पद्धतीने वाळू विक्री करणार व घरपोच वाळू करण्याचे धोरण स्वीकारणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांसाठी वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पावरील साकळाई पाणी उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौरव, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवाजी कर्डिले यांचा व नगर जिल्ह्यातला विविध योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल मंत्री विखे यांचा नागरी सत्कार रुईछत्तीसी (ता. नगर) येथे आज रविवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्री विखे यांनी वरील घोषणा केली.

अर्ज केल्यानंतर केवळ दोन महिन्यात जमिनीची मोजणी करून नकाशे घरपोच देणे, पाणंद व शिवरस्ते तीन महिन्यात सरकारी खर्चाने मोकळे करणार, येत्या जूनपासून एका अर्जात शाळेच्या विद्यार्थ्यांना ८ प्रकारचे दाखले मिळण्याची योजना राबवली जाणार असल्याची माहितीही महसूल मंत्री विखे यांनी दिली.  जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले म्हणाले साकळाई योजना मार्गी लागेल यावर अनेकांचा विश्वास नव्हता. आपणही यापूर्वी योजना मार्गी लावण्याच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सरकारला पाठिंबा दिला होता. परंतु तत्कालीन मंत्री अजित पवार व दिलीप वळसे यांना नगर जिल्ह्याला पाणी मिळू द्यायचे नव्हते.

पंचवीस वर्षांत जे जमले नाही ते खासदार डॉ. सुजय विखे यांनी करून दाखवले. पुढील पाच वर्षांत जर पुन्हा भाजपचे सरकार आले नाही तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते साकळाईचे काम बंद पाडतील.  प्रास्ताविकात खासदार सुजय विखे यांनी साकळाई योजनेची तसेच सर्वेक्षणाची माहिती देताना नगर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अडवले होते. भाजपशिवाय जिल्ह्याचे हक्काचे पाणी दुसरे कोणी देऊ शकणार नाही. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्याचे २० टीएमसी पाणी पळवले गेले. ते आपण पुन्हा मिळवून देऊ असा दावा केला. यावेळी युवा नेते विक्रम पाचपुते, साकळाई योजना कृती समितीचे बाबा महाराज झेंडे आदींची भाषणे झाली. आमदार बबनराव पाचपुते यांनी आभार मानले.

नगर जिल्हा पाणीदार करणार- उपमुख्यमंत्री

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते, परंतु त्यांनी नागपूरहून दृकश्राव्य पद्धतीने भाषण केले. गोदावरी खोऱ्याचे पश्चिमेला वाहून जाणारे पाणी नगर जिल्ह्याकडे वळून स्व. बाळासाहेब विखे यांचे, जिल्हा पाणीदार करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात केलेल्या विविध तरतुदींची माहिती दिली. 

शेतकऱ्यांना एकरकमी कर्जफेड योजनेचा लाभ देणार-कर्डिले विखे-कर्डिले एकत्र आल्यानंतर काय होते हे मला जिल्हा बँकेवर संधी मिळाल्यानंतर, जिल्ह्यातील अनेकांच्या लक्षात आले आहे. परंतु अध्यक्ष झाल्यामुळे अडचण झाली. मी अध्यक्ष नसताना काही गोष्टी करणे मला शक्य होते. परंतु आता त्यावर बंधने आली आहेत. लोकांच्या मागण्या वाढल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांना थकीत कर्जावर एकरकमी सवलत योजनेचा फायदा दिला जाईल, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले म्हणाले. 

‘कर्डिले-विखे एकत्रच आहेत’

शिवाजी कर्डिले यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाला विखेच जबाबदार असल्याचा आरोप काहीजण करत होते. परंतु मी कर्डिले यांचे प्रामाणिक काम केले. तरीही आरोप सहन करावे लागले. कर्डिले जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्यानंतर आता त्यांचा आणि आमचा हिशोब पूर्ण झाला आहे. आपल्या नेत्याचे पुनर्वसन व्हावे असे प्रत्येक कार्यकर्त्यांला वाटत असते. त्यामुळे कर्डिले आणि विखे एकच आहेत. हे कार्यकर्त्यांनी आता लक्षात घ्यावे, असे खासदार विखे यांनी स्पष्ट केले.