राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतलं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तब्बर १०९ आंदोलकांना अटक केली असून त्यांची रवानगी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यासोबतच त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्या आलं आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळातून या घटनेवर प्रतिक्रिया येत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रकारावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“शरद पवार प्रतिष्ठित नेते”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर विश्वास दाखवला आहे. “राज्याचे मुख्यमंत्री हे प्रकरण हाताळत आहेत. ते समजुतदार आहेत. खुद्द शरद पवार एक प्रतिष्ठित नेते आहेत. त्यामुळे या प्रकारची घटना कुणीही चांगली म्हणणार नाही. अशा प्रकारची घटना होऊ नये, असं मला वाटतं. त्यासाठी आमचं राज्य सरकार लक्ष देईल”, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”
Nitesh Rane, T Raja
प्रक्षोभक भाषण प्रकरण : नितेश राणे, गीता जैन, टी. राजांविरोधात फौजदारी कारवाई करणार का ? उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना प्रश्न

“काल सिल्व्हर ओकवर आलेले सगळेच…”, अजित पवारांचा गंभीर दावा; म्हणाले, “काल काही वेगळ्या गोष्टीही घडल्या!”

शरद पवार यांच्या निवासस्थानी अर्थात सिल्व्हर ओकवर शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी आंदोलक जमा झाले होते. त्यांनी घोषणाबाजी करतानाच पवारांच्या निवासस्थानाच्या दिशेने चपला देखील भिरकावल्या. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी; १०९ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

शरद पवार म्हणतात, “कर्मचाऱ्यांना पाठिंबा!”

दरम्यान, या प्रकारावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना पाठिंबा असल्याचं नमूद केलं. “आपण या कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत. चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही. एक चुकीचा रस्ता त्यांना दाखवला आणि त्याचे परिणाम आज इथे दिसत आहेत. नेता शहाणा नसला, तर कार्यकर्त्यांवर देखील त्याचा दुष्परिणाम होतो याचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

अजित पवारांची पोलिसांवर नाराजी

“माध्यमांना जी गोष्ट आधी कळते, ती गोष्ट मुंबई पोलिसांना का नाही समजू शकली?” असा सवाल करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी पोलीस या प्रकरणाचा छडा लावतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.