रायगड जिल्ह्यातील १९१ ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणुकच्या पाश्र्वभुमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली, निवडणुकीच्या निमित्याने उत्तर रायगडात शेकापची तर दक्षिण रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतीसाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. यापकी ५१ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. तर ६१ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध विजयी झाले. त्याच बरोबर २४२ ग्रामपंचायतीमधील ६३८ सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे सरपंचपदासाठी १७४ जागांसाठी ४५४ उमेदवार तर सदस्य पदाच्या १ हजार २८० जागांसाठी २ हजार ६५७ उमेदवार निवडणुक रिंगणात उरले आहेत. यांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिन मध्ये बंद होणार आहे.

निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून निवडणुक सामुग्री मदनान केंद्रावर पोहोचली आहे. निवडणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त तनात करण्यात आला आहे. शिघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्याही तत्पर ठेवण्यात आल्या आहेत.

निवडणूक होत असलेल्या सर्वाधिक ग्रामपंचायती या महाड तालुक्यातील आहेत . या निवडणूका राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जात नसल्या तरीआपापले वर्चस्व राखण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यावेळी काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस,शेकाप हे पारंपारीक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर शडडू ठोकून आहेतच शिवाय भाजपाने पहिल्यांदाच जिल्हयात मोठी ताकद लावली आहे . काही ठिकाणी वेगवेगळी राजकीय समीकरणे जुळून आली आहेत . त्यामुळे सर्वाचेच लक्ष या निवडणूकीकडे लागले आहे. काही ठिकाणी स्थानिक गावकीच्या पातळीवर उमेदवार देण्यात आले आहेत तर काही ठिकाणी राजकीय स्थितीला अनुसरून युत्या – आघाडया करण्यात आल्या आहेत . त्यामुळे निकालातही गंमत असणार आहे.

यावेळच्या निवडणूक प्रचारात स्थानिक प्रश्नांना अधिक महत्व देण्यात आले होते . पाणी,पथदिवे,रस्ते,घरगल्ल्या,गटारे हे प्रश्न प्राधान्याने चच्रेत राहिले . ग्रामपंचायत निवडणूकीत अनेक ठिकाणी राजकारणापलीकडे नातेसंबंध,भावकी,गावकी यांना विशेष महत्व असतेते यावेळच्या निवडणूकीतही दिसून आले.

ग्रामपंचायतनिवडणुकीत यावेळी सरपंच निवड हि थेट मतदारामधून होणार असल्याने गावपातळीवर राजकीय पक्षाने मोच्रे बांधणीला विशेष महत्व दिले होते. जिल्ह्यात काही ठिकाणी सरळ तर काही ठिकाणी दुरंगी,तिरंगी लढत पाहण्यास मिळणे अपेक्षित आहे. उत्तर रायगडात शेकाप तर दक्षिण रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्याने प्रतिष्ठेला लागणार आहे.सर्व ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी होणार आहे.  १६ ऑक्टोबरला होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकिसाठी जिल्हा प्रशासनाबरोबर पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे १२० पोलीस अधिकारी, ७५४ पोलीस कर्मचारी, ६ आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्स, ३७१ होमगार्ड, १०१ वाहने असा चोख बंदोबस्त निवडणुकिसाठी ठेवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gram panchayat election in raigad district
First published on: 16-10-2017 at 00:57 IST