राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर आज निकाल जाहीर होत आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर वेगवेगळे कौल हाती येऊ लागले आहेत. तर अनेक ग्रामपंचायतीचं निकालही लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात उतरली होती. निवडणूक निकालात इतर पक्षांची घौडदौड सुरू असताना मनसेला दिलासा देणारे निकाल समोर आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत मनसेनं शिवसेना-भाजपा युतीला धूळ चारत विजय संपादीत केला आहे. काकोळी ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली. यात मनसेनं युतीच्या उमेदवारांचा पराभव करत ग्रामपंचायतीवर कब्जा केला.

आणखी वाचा- राम शिंदेंना रोहित पवार पुन्हा पडले भारी; चौंडीत राष्ट्रवादीनं उधळला गुलाल

ग्रामपंचायतीत मनसेचा नगरसेवक विराजमान होणार असून, ७ पैकी ४ जागा पक्षानं जिंकल्या आहेत. सर्व विजय उमेदवारांचं पक्षाच्या वतीनं अभिनंदनही करण्यात आलं आहे. “आपले ‘मनसे’ अभिनंदन! घासून नाय, तर विरोधकांची ठासून! सरपंच मनसेचा, विकास सर्वांचा! अंबरनाथ मधील काकोळी ग्रामपंचायत मधील ०७ पैकी ०४ सदस्य विजयी!,” अशा शब्दात मनसेनं नवनिर्वाचित सदस्यांचं अभिनंदन केलं आहे.

आपले ‘मनसे’ अभिनंदन!

घासून नाय, तर विरोधकांची ठासून! सरपंच मनसेचा, विकास सर्वांचा! अंबरनाथ मधील काकोळी ग्रामपंचायत मधील ०७ पैकी ०४ सदस्य विजयी! #RajThackeray #MNS #मनसेवृत्तांत

Posted by मनसे वृत्तांत अधिकृत on Sunday, 17 January 2021

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gram panchayat results maharashtra navnirman sena mns wins many local body bmh
First published on: 18-01-2021 at 14:02 IST