कराड : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सातारा जिल्हा व कराड दक्षिणच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. त्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. ‘देशभक्ती’च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता.

‘भारत माता की जय, वंदे मातरम्’ अशा घोषणांसह देशभक्तिपर गाणी व घोषवाक्यांनी रॅलीदरम्यान, देशप्रेमाचे वातावरण निर्माण बहरले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव आणि नव्या पिढीला देशसेवेची प्रेरणा देणे, हा या रॅलीचा मुख्य उद्देश असल्याचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी या वेळी सांगितले.

या तिरंगा रॅलीतून स्वातंत्र्याचा महत्त्वपूर्ण इतिहास स्मरणात ठेवण्याचा आणि राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देण्यात आला होता. उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी देशभक्तीची भावना जागवणाऱ्या घोषणांसह मुख्य मार्गावरून काढलेल्या या भव्य फेरीला चौका- चौकात प्रतिसाद मिळाला.  लोकांनी ठिकठिकाणी तिरंगा फेरीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.  रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती.

तिरंगा रॅलीमध्ये भाजपचे राज्य परिषद सदस्य संजय पवार, हर्षवर्धन मोहिते, कराड दक्षिण मंडल अध्यक्ष राजेंद्र यादव, युवा मोर्चाचे सूरज शेवाळे, भारत जंत्रे, शंकर निकम, प्रवीण साळुंखे, माजी तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, माजी नगरसेवक दिनेश रैनाक, राजू मुल्ला, सुहास कदम, हणमंत जाधव, सूर्यकांत खिलारे, अण्णासाहेब काशीद, तानाजी देशमुख, प्रमोद पाटील, डॉ. सारिका गावडे, आनंदी शिंदे, पंकज पाटील, चंद्रकांत लाखे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

दरम्यान, सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहात व मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी शासकीय यंत्रणा,  संस्था,  संघटना,  सार्वजनिक गणेश व अन्य मंडळे, शाळा,  महाविद्यालये,  नागरिकांनी मोठी तयार केली आहे. सर्वत्र तिरंगे, देशाभिमानी वातावरण राहावे असा सर्वांचा प्रयत्न राहिला आहे.