आज आंतरवली सराटी या ठिकाणी झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. तसंच गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीस यांचा माणूस असून देवेंद्र फडणवीस यांनी त्याला समज द्यावी आणि देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान मोदींनी समज द्यावी असंही म्हटलं आहे. आता या सगळ्या प्रकरणी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांची भाषा शिवराळ असल्याचीही टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

गुणरत्न सदावर्ते यांनी काय म्हटलं आहे?

“मला वाटतं की जरांगे पाटील यांच्या सभेत कोणत्याही सभेत कोणत्याही कायदेशीर बाबींवर चर्चा झाली नाही. मनोज जरांगे पाटील यांची सभा जरांगे यात्रेसारखी झाली. या सभेत आलेल्या लोकांची निराशाच झाली असेल. सभा काही खास झाली नाही. अरेरावी आणि अरेरावीची भाषा त्यांनी केली. मसीहा असल्याची पाटी जरांगे पाटील लावून घेत आहेत. माज आल्याची भाषा ही आरक्षणासाठी कोणत्याच अर्थाने आरक्षणासाठी मागासलेपण दाखवत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःच दाखवून दिलं की आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही स्वतः तरी पात्र नाही. तसंच मला हे देखील सांगायचं आहे.”

मनोज जरांगे पाटील यांचं भाषण मराठा वर्ग करुन आरक्षण द्या. ते कोर्टाने नाकारली आहे. थयथयाट करत कुणब्यांमधून आरक्षण द्या म्हणत होते. मला कुणाला हिणवायचं नाही पण जरांगे पाटील मी तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी, कष्टकरी यांची भाषा अशी नसते. जरांगे पाटील आत्ता तेच बोलत आहेत जे शरद पवार यांनी सर्वात आधी जी भेट घेतली त्याचे परिणाम झाल्यासारखे दिसत आहेत. पॉलिटिकल बॉसेससाठी लॉयल होऊन एका मर्यादेपर्यंत रहावं. कारण अति लॉयल होऊन हाती काहीच लागत नाही. सारथीला जास्तीचे पैसे द्या हे म्हणण्यात मनोज जरांगे पाटील यांचा विद्यार्थ्यांना उचकवण्याचा प्रयत्न आहे असाही आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला.

एक मराठा लाख मराठा ही घोषणा सैन्याची

एक मराठा लाख मराठा ही घोषणा सैन्याची, ही जातीची घोषणा नाही. ज्याप्रकारे पोलिसांना टार्गेट करण्यात आलं ही आगपाखड आहे. मला सायलेंट करण्यासाठी बोललं जातं, पण मी सायलेंट होणार नाही. जरांगेचे पॉलिटीकल बॉसेस वेगळे आहेत. जरांगेंनी त्यांच्या पॉलिटीकल बॉसेसला दाखवून दिलंय की ते किती लॉयल आहेत, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुणरत्न सदावर्तेंबाबत काय म्हणाले होते मनोज जरांगे पाटील?

“त्याला (गुणरत्न सदावर्ते) यश मिळवायचं होतं तेव्हा त्याने एक मराठा लाख मराठाची घोषणा आझाद मैदानात दिली होती. आता एक लाख मराठे एकत्र आले आहेत, त्यांचं भलं होतंय तर सांगतो मी हिंसा घडवणार आहे. तुम्ही मला सांगा आता मला अटक करणं हे इतकं सोपं आहे का? मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात जाणारा तूच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला (गुणरत्न सदावर्ते) समज द्यावी. तो तुमचा कार्यकर्ता आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझं सांगणं आहे तो तुमचा कार्यकर्ता आहे, तुम्ही मराठ्यांना अंगावर घेऊ नका. याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार निवडून दिले आहेत हे विसरु नका. केंद्रात आणि राज्यात सत्ता आणण्यात मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका.”