scorecardresearch

Premium

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जाती-जातींमधला द्वेष वाढला, असंच होत राहिलं तर…”; राज ठाकरेंचा आरोप

राज ठाकरे यांची ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीवर पुन्हा टीका

What Raj Thackeray Said?
राज ठाकरेंचा पुन्हा एकदा शरद पवारांवर आरोप

जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते अनेकांना ती गोष्ट आवडते. जात आवडण्याची कारणं वेगवेगळी असतात. घरातली संस्कृती, खाद्यसंस्कृती हे विषय त्यामागे असतात. स्वतःच्या जातीवर अभिमान, आपलेपणा असणं हे महाराष्ट्रात होतं. १९९९ मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यानंतर स्वतःच्या जातीपेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे महाराष्ट्रात सुरु झालं असा आरोप राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा केला.

…तर महाराष्ट्राचा बिहार होईल

महाराष्ट्रात जर अशीच जातीय तेढ वाढायला लागली तर आपलाही बिहार किंवा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. याबाबत मी माझ्या भाषणातही बोललो होतो. या नेत्यांच्या निवडणून येण्याच्या स्वार्थी राजकारणापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतो आहोत. ज्या महाराष्ट्राचं उदाहरण देशभरात दिलं जातं त्या महाराष्ट्रात या गोष्टी सुरु आहेत. संत परंपरा किंवा इतर विचार असतील, सगळ्याच बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर होता आणि राहील मात्र महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत हे दुर्दैवी आहे.

caste supremacy
काँग्रेसच्या चेहऱ्यावरील जातवर्चस्वाचा ओरखडा पुसण्याचा प्रयत्न
adarsh Mention in shwetpatrika
श्वेतपत्रिकेतील आदर्श उल्लेखानंतर राजकीय भूकंप, सिंचन घोटाळ्याच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत बंड
सांगली मिरजेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन
Pratibha Pawar in NCP office
नातवासाठी आजी आली धावून; रोहित पवारांच्या ईडी चौकशीआधी प्रतिभा पवार राष्ट्रवादी कार्यालयात दाखल

माझ्या पक्षात जातीपातीच्या राजकारणाला थारा नाही

माझ्या पक्षात मी कुठल्याही जाती-पातीच्या राजकारणाला थारा दिलेला नाही देणार नाही. जर मला असं प्रकार कळलं तर मी त्या व्यक्तीला दूर करेन असंही राज ठाकरे म्हणाले. माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा आहे. जर चांगल्या क्षमतेचा माणूस असेल तर तो कुठल्या जातीचा आहे हे मी बघत नाही. जातपात मी मानत नाही असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. ठाण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना जातीच्या राजकारणावर प्रश्न विचारण्यात आला. त्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातींचा द्वेष वाढला असं म्हटलं आहे.

भाजपावरही टीका

मी माझ्या भाषणात मागेही बोललो होतो की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही जन्माला येत नाही. जगात अनेक अशी उदाहरणं आहेत. ५६ ते ५८ वर्षे काँग्रेसने राज्य केलं आहे देशावर. आपण कधी विचार केला होता का की ५५ खासदारांवर हा पक्ष येईल? असं कुणाला तरी वाटलं होतं का? सगळ्या गोष्टींचं उत्तर काळ असतो तो उत्तर देत असतो असं राज ठाकरे म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hatred between castes and castes increased in maharashtra after ncp birth said raj thackeray scj

First published on: 16-11-2023 at 14:58 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×