रायगड जिल्ह्य़ात अतिवृष्टी आणि पुराने सहा जणांचा बळी घेतला आहे. सर्वाचे मृतदेह रविवारी सापडले. जिल्ह्य़ात यावर्षी नसíगक आपत्तीमुळे दगावलेल्यांची संख्या आता १३वर पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्य़ात २६ आणि २७ जुलला सरासरी ३५० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. काही भागांत ६०० मिलिमीटरच्या आसपास पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली. वेगवेगळ्या ठिकाणी सहा जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

माथेरानमधील जामा मशिदीसमोरच्या नाल्यात पडून युवराज धीरज वालेंद्र वाहून गेला होता. त्याचा मृतदेह त्याच नाल्यात रविवारी सापडला. कर्जत येथील दहिगाव इंजिवली येथील विवेक बबन भालेराव (१८) नाला ओलांडत असताना वाहून गेला होता. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला. पोलादपूर तालुक्यात कुडपण येथे राजेंद्र विश्राम शेलार हा नदीच्या पुरात वाहून गेला होता. रात्री उशिरा त्याचा मृतदेह एका पुलाखाली आढळला. पोलीस प्रशासन, ट्रेकर्स पथके आणि स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने पुराच्या पाण्यात उतरून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

पनवेल तालुक्यातील उसरोली येथे चेतन यशवंत मोरे (३०) याचा नदीत बुडून मृत्यू झाला. रोहा तालुक्यातील नागोठणे येथे परशुराम विचारे यांचाही तलावात बुडून मृत्यू झाला.

अलिबाग तालुक्यातील चौल बागमळा परिसरात उघडीमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेला यश म्हात्रे वाहून गेला होता. स्थानिक प्रशासन सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांचा शोध घेत होते. अखेर थेरोंडा येथील गणपती पाडा येथे त्याचा मृतदेह आढळला. नसíगक आपत्तीमुळे रायगड जिल्ह्य़ात जूनपासून आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला. त्यातील तीन जणांना राज्य सरकारने १२ लाख रुपयांची मदत दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rainfall in maharashtra mpg 94
First published on: 29-07-2019 at 01:05 IST