लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : सांगली बाजार समितीमध्ये शनिवारी निघालेल्या हळद सौद्यामध्ये प्रती क्विंटल ३२ हजाराचा दर मिळाला असून यंदाच्या हंगामातील हा सर्वोच्च दर आहे. सदरची हळद संगमेश्वर ट्रेडर्स (काडाप्पा) यांच्या दुकानामध्ये श्री बसवराज भिमाप्पा दासनाळ (रा. कल्लोळी ता. मुडलगी जि. बेळगांवी) यांनी विक्रीसाठी आणलेली होती. सदरची हळद खरेदीदार मनाली ट्रेडींग कंपनी यांनी खरेदी केली.

आणखी वाचा-नांदेड : अपघातात परीक्षार्थी दोन विद्यार्थी ठार; एक गंभीर

सध्या हळद या शेतीमालास उच्चांकी भाव मिळत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात खरेदीदार , व्यापारी, शेतकरी, हमाल आदी उपस्थित होते. दर चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपली हळद सांगली बाजारात विक्रीसाठी आणावी असे आवाहन सभापती श सुजयनाना शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे.