मुंबई महापालिकेकडून ठाणे जिल्हा परिषदेला देण्यात येणाऱ्या सेसच्या रकमेचे वाटप करताना शहापूर तालुक्याला सापत्नभावाची वागणूक दिली जाते, तसेच विविध योजनेंतर्गत निधी देतानाही या तालुक्याला पक्षपाती वागणूक दिली जात आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संतप्त झालेले शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य ४ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.
 शहापूर तालुक्यातील तानसा, वैतरणा, भातसा या धरणांतून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. त्याबाबत मुंबई महापालिकेकडून शासनामार्फत ठाणे जिल्हा परिषदेकडे सेस म्हणून करोडो रुपये जमा केले जातात. विकासकामे करण्यासाठी या सेसच्या रकमेवर शहापूर तालुक्याचा हक्क असताना या रकमेचे वाटप करताना शहापूर तालुक्याला सापत्नभावाची वागणूक दिली जाते. याशिवाय १३ वित्त आयोग, आदिवासी, बिगर आदिवासी योजना अशा विविध योजनेंतर्गत शहापूर तालुक्याला पक्षपाती वागणूक दिली जाते. शहापूर तालुक्यातील रस्त्यांची खड्डय़ांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे.जिल्हा परिषदेकडून व जिल्हा नियोजन विभागाकडून शहापूर तालुक्याला सापत्न वागणूक दिली जात असल्याने या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संतप्त झालेले शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४ फेब्रुवारीला उपोषणास बसणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hunger strike of shahapur zp and panchyat committee
First published on: 04-02-2013 at 03:25 IST