कोकणातले शेतकरी आत्महत्या करत नाहीत याचा अभिमान वाटतो असे वक्तव्य लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले आहे. कोकणाताली माणसं कष्टकरी आहेत, ते गरीबीत दिवस काढतील मात्र आत्महत्या करणार नाहीत. परिस्थितीवर मात करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद कोकणच्या माणसात आहे याचा मला अभिमान आहे असेही सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे. कोकणातील गुहागरमध्ये असलेल्या व्याडेश्वर मंदिरात सुमित्रा महाजन दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकणातल्या तरूणांनी आता पुढे येत काम करण्याची आवश्यकता आहे. कोकणचा विकास करायचा असेल तर सर्व पक्ष, जाती-भेद बाजूला ठेवून तुम्ही एकत्र या. त्यासाठी देशाच्या पातळीवर जे सहकार्य लागेल ते देण्यास मी तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. निवडणुका जवळ आल्या असल्या तरीही मी येणाऱ्या सरकारच्या काळातही कोकणाच्या विकासासाठी निश्चित प्रयत्न करेन असंही महाजन यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I have proud of kokans farmer because they were not commits suicide says sumitra mahajan
First published on: 22-01-2019 at 21:42 IST