राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात १५ दिवसांच्या लॉकाडाउची घोषणा करण्यात आलेली आहे. दरम्यान, आज राज्याचे आरोग्यमंत्री यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत, संबंधितांना काही महत्वपूर्ण सूचना देखील केल्या आहेत. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. यावेळ त्यांनी बेड्सच्या तुटवडयाच्या मुद्याबाबत देखील माहिती दिली.  बेड्स नाही हे उत्तर मी कदापि सहन करणार नाही, रूग्णसंख्येनुसार बेड्सची संख्या वाढवलीचं पाहिजे, असा इशारा आपण दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘रेमडेसिवीर’साठी आता निर्यात बंदी असलेल्या कंपन्यांकडून माल घेण्याचे प्रयत्न सुरू – टोपे

राजेश टोपे म्हणाले, “सगळ्यात महत्वाचं बेड मॅनेजमेंट मी ज्याला म्हणेल, रूग्णसंख्येचा जिल्ह्याचा ग्रोथ रेट काय आहे. त्या गतीनुसार बेड्स देखील वाढलेच पाहिजे. बेड्स नाही हे उत्तर मी कदापि सहन करणार नाही. वैद्यकीय सुविधा किंवा आरोग्य सुविधा वाढवल्या गेल्या पाहिजे. जिथं आवश्यकता असेल तिथं ऑक्सिजनेटेड बेड्स वाढवले गेले पाहिजेत. रूग्णालयात जागा नसेल तर एखाद्या संस्थेत वाढावा, कुठंही वाढावा पण बेड्स नाहीत अशी परिस्थिती होता कामानये, खासगी रूग्णलायत देखील जे रूग्णालय असतील आपण ८० टक्के बेड्स ताब्यात घेतलेच पाहिजे, असा देखील इशारा सर्वांना देण्यात आलेला आहे.”

तसेच, “कोविडचा जो काही प्रोटोकॉल आहे, जी काही नियमावली आम्ही बनवली आहे. सामान्य रूग्णाला समोर ठेवून जे काही महत्वपूर्ण निर्णय़ आम्ही आतापर्यंत घेतलेले आहेत, त्या सर्वांची तंतोतंत अंमलबाजवणी झाली पाहिजे, हे प्रामुख्याने सांगितलं आहे. यामध्ये रेट संदर्भात आपण ऑडिटर्स नेमलेले आहेत. ऑडिटर्सने स्वाक्षरीकरून नंतरच बिल दिलं पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सर्व निर्देश दिले आहेत.” असं देखील टोपेंनी सांगितलं.

Coronavirus – पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पत्र, म्हणाले…

“केंद्र शासनाने सांगितल्याप्रमाणे ट्रॅकिंग, ट्रेसिंगच प्रमाण असायलच हवं. हे देखील आम्ही कटाक्षाने सांगितलं आहे. २४ तासात तपासणीचा रिपोर्ट आलाच पाहिजे. संस्थात्मक विलगीकरणावर भर दिला गेला पाहिजे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे.” या काही प्रमुख मुद्यांवर आम्ही चर्चा केली आहे. अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will not tolerate the answer that there are no beds tope msr
First published on: 15-04-2021 at 19:12 IST