इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत गोविंदराव ऊर्फ आबासाहेब घोरपडे (वय ८४) यांचे मंगळवारी सकाळी पुणे  येथे निधन झाले. इचलकरंजीच्या सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.

आधुनिक इचलकरंजीचे शिल्पकार बाबासाहेब तथा नारायणराव घोरपडे यांचे ते सुपुत्र होते. इचलकरंजी संस्थानचा राजवाडा गोविंदराव यांनी डीकेटीई या संस्थेस शैक्षणिक कार्यासाठी दिला होता. आता तिथे आंतरराष्ट्रीय ख्यातीची वस्त्रोद्योगातील शिक्षण देणारी संस्था उभी आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच डीकेटीई अंतर्गत येणारे अभियांत्रिकी महाविद्यालय व शाळा बंद करण्यात आली.  डीकेटीईचे अध्यक्ष, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, प्राचार्य प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी दु:ख व्यक्त केले. घोरपडे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून पुणे येथे वास्तव्यास आहेत.

nagpur matin bhosale marathi news, nagpur fasepardhi marathi news
फासेपारधींच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या मतिन भोसलेंचा सन्मान, राष्ट्रसंत शिक्षण सेवा पुरस्काराने गौरव
kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
Babasaheb Ambedkar Research and Training Institute
बार्टीचे अधिकारी निघाले लंडनला! ग्लोबल भीमजयंतीच्या नावाखाली वंचित विद्यार्थ्यांच्या पैशाचा…
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती

इतिहास घोरपडे घराण्याचा

नारो महादेव जोशी हे घराण्याचे मूळ पुरुष कोकणचे. लहानपणीच वडील वारल्याने ते आईसह आजरा संस्थानात आले. त्यांना युद्धाची आवड म्हणून सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या सेवेत दाखल झाले. युद्धात कर्तबगारी दाखवल्याने संताजींनी त्यांना इचलकरंजीची जहागिरी बहाल केली. त्यांनीही मग स्वामिनिष्ठ म्हणून जोशी नावाचा त्याग करून घोरपडे हे नाव स्वीकारले. पुढे नारायणराव उर्फ बाबासाहेब घोरपडे यांनी आधुनिक इचलकरंजीचा पाया रचला. टिळक, आगरकर यांच्या सहवासात ते असत. बाबासाहेबांनी विठ्ठलराव दातार यांना १९०४ साली इचलकरंजीत पहिला यंत्रमाग आणण्यास प्रोत्साहन दिले आणि पुढे ही वस्त्रनगरी बनली. गोविंदराव यांनी ही परंपरा आपल्या परीने पुढे नेली.