“हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली”, असं धक्कादायक विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यांच्या या विधानाचे पडसाद सामिजक आणि राजकीय पद्धतीने उमटले. यावरून आता पुन्हा एकदा ओबीसी नेते आणि महायुतीतील मंत्री छगन भुजबळ यांनी खोचक प्रत्युत्तर दिले आहे. बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“आमच्या हाताखाली त्यांनी काम करणं एवढी आमची लायकी नाही. आमची खरंच लायकी नाही. जातीनिहाय आम्ही लहान आहोत, ते मोठे आहेत. एखादा कलेक्टर कांबळे असला तर त्याच्या हाताखाली मराठा समाजाने काम कसं करायचं?” असा खोचक प्रश्न छगन भुजबळांनी विचारला.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

हेही वाचा >> “लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची मराठ्यांवर वेळ”, जरांगे-पाटलांच्या विधानावर भुजबळ उद्विग्न होत म्हणाले…

ते पुढे म्हणाले की, मग त्या कलेक्टरच्यावर सुपर कलेक्टर नेमायला हवा. एखादा आदिवासी चीफ इंजिनिअर झाला तर कसं काय काम करायचं? एखादा सुपर चीफ इंजिनिअर नेमला पाहिजे. आमची लायकी नाहीय. मराठ्यांची सगळी लायकी आहे. ते आमच्यापेक्षा उच्च आहेत. म्हणून त्यांच्याकडे सगळी सुत्रे असली पाहिजेत. मराठा समाजातील मुलं शिकतात, कलेक्टर होतात, एसपी होतात. कशासाठी? शेवटी त्यांची चाकरी करायची आहे असं त्यांचं म्हणणं आहे”, अशीही उपहासात्मक टिप्पणी त्यांनी केली.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले होते?

“मराठा समाजातील मुलांना ९५ टक्के पडूनही नोकरी लागत नाही. आमची मुले हुशार असतानाही, आरक्षणात बसत असूनही आरक्षण नसल्याने लाखो मुले सुशिक्षित बेरोजगार राहिले. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते. नोकरीतील टक्का कमी झाला, परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं होतं.