सांगली : भाजपा  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३७ टक्के मते घेऊन देशाच्या सत्तेत आले होते. मात्र या निवडणुकीत ते ३२-३३ टक्क्यां पर्यंत खाली आल्यास,ते देशातील सत्तेतून जाऊ शकतात असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे केले. हातकणंगले मतदार संघातून महाविकास  आघाडीचे सत्यजित पाटील हे चांगल्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.   

हेही वाचा >>> “पूर्वी उद्योजकांच्या खाली बॉम्ब लावून…”, प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

इस्लामपूर  येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या आभार सभेत बुधवारी ते बोलत होते. याप्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आ.सत्यजित पाटील,सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ.मानसिंगराव नाईक, युवा नेते प्रतिक  पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.   

हेही वाचा >>> “महाविकास आघाडी टिकवायची असेल तर…”; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा थेट काँग्रेसला इशारा

आ.पाटील पुढे म्हणाले, सांगली मतदारसंघात माझ्या नावाने खडे फोडतात. मात्र सध्याचे अपक्ष उमेदवार आहेत,त्यांच्या नावाची मी शिफारस केली होती. मात्र शिवसेनेच्या कोल्हापूर, हातकणंगले या जागा छ.शाहू महाराज व राजू शेट्टी यांना देणार असल्याने त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला. राज्यातील ४८ जागा मध्ये भाजपास  १२ ते १५  पेक्षा जादा जागा मिळणार नाहीत असे आजचे चित्र आहे. आता विधानसभेची निवडणूक आहे. ताकदीने कामाला लागा. मतदार याद्यावर लक्ष ठेवा,बुथच्या कामास अधिक गतिमान करा. मी मतदार संघाचा संपर्क दौरा करणार आहे.      

यावेळी आ. नाईक, सत्यजित पाटील, उबाठा शिवसेनचे अभिजित पाटील, शकील सय्यद, काँग्रेस पक्षाचे संदीप जाधव, कॉ.धनाजी गुरव, महिला राष्ट्रवादीच्या सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने, बी.के. पाटील, संग्राम फडतरे, देवराज देशमुख, पुष्पलता खरात आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.