एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. “पोलीस आयुक्त कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत”, असा प्रश्न जलील यांनी विचारला. तसेच दोन केंद्रीय मंत्री आणि तीन राज्यातील मंत्री गँगस्टरप्रमाणे वागत होते, असा आरोप केला. ते औरंगाबादमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

इम्तियाज जलील म्हणाले, “दंगलीत सर्वात जास्त जबाबदारी सरकारमध्ये असलेल्या भाजपा आणि शिंदे गटावर आहे. ते सरकारमध्ये बसले आहेत. ती जबाबदारी माझ्यावर नाही. आज पोलिसांवर काय ताण असेल. मला पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे विचारायचं आहे की, ते कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत.”

“शहराला आग लागू द्या, पण आमच्या लोकांना थांबवू नका”

“पोलीस आयुक्तांना देवेंद्र फडणवीसांनी, एकनाथ शिंदेंनी शहराला आग लागू द्या, पण आमच्या लोकांना थांबवू नका. त्यांना सावरकरांची गौरव यात्रा काढू द्या, असं सांगितलं होतं का?” असा सवाल इम्तियाज जलील यांनी विचारला.

हेही वाचा : “संजय शिरसाटांचा दुसरा संजय राऊत झाला, ते माझा नंबर…”, इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दोन केंद्रीय मंत्री आणि तीन राज्यातील मंत्री गँगस्टरसारखे वागत आहेत”

“दोन केंद्रीय मंत्री आणि तीन राज्य सरकारचे मंत्री गुंड वागतात तसे गँगस्टरसारखे वागत आहेत. शहरात दंगल झाली तरी त्यांना काही देणंघेणं नाही. दंगल होतेय होऊ द्या, राडा होतोय, होऊ द्या. तणाव निर्माण होतोय, होऊ द्या. मात्र, त्यांना त्यांच्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत,” असा आरोप जलील यांनी केला.