नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्ण दगावल्याने राज्यात मोठी खळबळ माजली आहे. हाफकिनकडून औषधे घेण्याकरता निधींची कमतरता असल्याने औषधांचा पुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी औषधांच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

“राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत. नांदेड येथील घटना त्याचे उदाहारण आहे. अत्यंत दुर्दैवी आणि हृदय हेलावून टाकणारी घटना नांदेड येथे घडली आहे. १२ बालकांच्या मृत्यूसह एकूण २४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुळात तीन तिघाड्यांचं सरकार राज्याकडे दुर्लक्ष करतंय. ठाण्यातील घटना ताजी असतानाच नांदेडमधील घटना दुर्दैवी आहे”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

हेही वाचा >> “नांदेड रुग्णालयातील मृत्यू औषधांच्या तुटवड्यामुळे नाहीत”, अधिष्ठातांनी दिली माहिती; मृत्यूमागचं सांगितलं कारण

“रुग्णालयात डीन पूर्णवेळ नाही. अनेक पदे रिक्त आहेत. तसंच, औषधांचा पुरवठा व्यवस्थित नाही. सर्जन नाहीत. याहीपलिकडे जाऊन रुग्णांची वेळेवर तपासणी होत नाही, रुग्णांना अटेंड केलं जात नाही. २४-२४ तास डॉक्टर फिरकतही नाहीत. हाफकिनने खरेदी बंद केल्यानंतर औषधही मिळत नाहीत. २४ तासांत २४ रुग्णांचा जीव गेला आहे. आता शासनाला विनंती आहे की ७८ रुग्ण अत्यंत गंभीर आहेत. त्या ७८ रुग्णांचा जीव वाचवणं गरजेचं आहे”, असंही ते म्हणाले.

तीन पक्षांचं सरकार काय करतंय?

“स्वच्छतेचा अभाव असून कंत्राटी पद्धतीने नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ती पदेही भरण्यात आलेली नाहीत. नर्स, लेक्चरर, सिनिअर डॉक्टरच्या जागा रिक्त आहेत. डीन प्रभारी आहेत. सहा -सहा महिन्यांत मंत्री बदलले जातात. खाती बदलली जातात. पूर्णवेळ मंत्री नाहीत. पालकमंत्र्यांकडे पाच पाच जिल्हे असल्याने रुग्णालयाला पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे औषधांकरता निधीही नाही. त्यामुळे तिघांचं सरकार काय करतंय? असा सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा >> नांदेडमधील शासकीय रूग्णालयात २४ तासांत २४ रूग्णांचा मृत्यू, विरोधकांचं सरकारवर टीकास्र; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

“एकीकडे योजनांचा पाऊस पाडल्याची घोषणा करायची आणि दुसरीकडे आरोग्य यंत्रणांची दुरवस्था करायची. आरोग्य यंत्रणेशी खेळण्याचा दुर्दैवी प्रकार होतोय. आता ७८ लोकांचा जीव वाचवा, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांची मदत घ्या. राज्यातील अनेक रुग्णालयात हीच अवस्था आहे. ही संपूर्ण परिस्थिती राज्याची मान शरमेने खाली घालावी अशी निर्माण झाली आहे. या सर्व घटनेकडे सरकारचं लक्ष वेधत असताना याकडे गांभीर्याने पाहा नाहीतर परिणाम भोगावे लागतील. गंभीर असलेल्या लोकांचे जीव वाचवा. हे मृत्यू शासनपुरस्कृत आहेत”, असा आरोपही त्यांनी केला आहे.