scorecardresearch

Premium

Maharashtra Hospital Death : नांदेडमधील शासकीय रूग्णालयात २४ तासांत २४ रूग्णांचा मृत्यू, विरोधकांचं सरकारवर टीकास्र; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

24 Deaths in Maharashtra Government Hospital : ठाण्यातील महापालिका रूग्णालयात १० तासांत १८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नांदेडमधील या घटनेवरून सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

eknath shinde
एकनाथ शिंदे यांनी नांदेडमधील मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ( सीएमओ फेसबुक अकाउंट छायाचित्र )

Shankarrao Chavan Government Hospital Nanded Deaths : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात २४ तासांत २४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( २ ऑक्टोबर ) समोर आली. मृतांमध्ये ६ मुले आणि ६ मुलींचा समावेश आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तर, शिंदे सरकारवर सर्व स्तरातून टीकास्र सोडलं जात आहे.

विष्णुपुरी परिसरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आहे. रुग्णालयात गेल्या २४ तासांत ६ मुले व ६ मुली या १२ बालकांसह सात स्त्रिया आणि पाच पुरुष दगावले आहेत. मृतांमध्ये सर्पदंश, विषप्राशन तसेच अन्य आजारांचेही रुग्ण होते. यातील काही जण परराज्यातील असल्याचे सांगण्यात आलं.

death certificate in Medical in Nagpur
नागपुरातील मेडिकलमध्ये मृत्यू प्रमाणपत्रासाठी ५८ दिवसांची फरफट.. अधिकारी, कर्मचाऱ्यांचा असा गोंधळ..
Telangana MLA Lasya Nanditha
३७ वर्षीय महिला आमदाराचा अपघातामध्ये मृत्यू, मागच्या वर्षी याच महिन्यात वडिलांचे झाले होते निधन
Right to Information Activist Santosh Kadam Murder Case Three Involved two were arrested
माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम खून प्रकरणात तिघांचा सहभाग; दोघांना अटक
Nana Patole on devendra Fadnavis
“गाडीखाली श्वानाचा मृत्यू झाला तरी राजीनामा मागतील”, फडणवीसांच्या वक्तव्यावर पटोलेंचा संताप; म्हणाले, “लाचारी…”

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दुर्घटनेबाबत माहिती घेतली जाईल. त्यावर जे काही उपाय आहेत, ते केले जातील,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

“परिस्थिती निश्चितच चिंताजनक”

या घटनेबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “रूग्णालयाच्या अधिष्ठातांशी चर्चा केली आहे. परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे. वैद्यकीय महाविद्यालय असल्यानं शासनानं तातडीनं कारवाई आणि मदत करण्याची आवश्यकता आहे.”

“…तर ही धोक्याची घंटा आहे”

“आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत अयशस्वी ठरत आहेत. सावंत यांच्यात हातात महाराष्ट्राच्या आरोग्य दिले, तर ही धोक्याची घंटा आहे. हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेत फेरबदल करावे,” असे म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या, सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंतांना हटवण्याची मागणी केली.

हेही वाचा : “…हे मृत्यू योगायोग नक्कीच नाहीत”, नांदेडच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप

“मृत्यूंना सरकार जबाबदार”

“ठाण्यातील महापालिका रूग्णालयात झालेल्या मृत्यूनंतर अन्य ठिकाणीही या घटना घडत आहे. कारण, हाफकिनकडून औषधांची खरेदी करण्यात आलेली नाही. अनेक वैद्यकीय आणि सरकारी रूग्णालयांत लोकांचा मृत्यू होत आहे. या मृत्यूंना सरकार जबाबदार आहे,” असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde on nanded shankarrao chavan hospital 24 death ssa

First published on: 03-10-2023 at 08:13 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×