संगमनेर : पुण्यात नोकरीला असलेल्या नव दाम्पत्याने संगमनेर तालुक्यातील साकुर या आपल्या मूळ गावी येत गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या दाम्पत्याचे लग्न होऊन अवघे अडीच – तीन महिने झाले होते. झाडाला गळफास घेतलेले त्यांचे मृतदेह आढळून आल्याने हा आत्महत्येचा प्रकार असावा असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. त्यांनी आत्महत्या का केली किंवा इतर काही कारण आहे काय या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

वैभव दत्तात्रय आमले (वय २३ वर्ष) आणि स्नेहा वैभव आमले (वय २० वर्ष) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नव दाम्पत्याचे नाव असून साकुरच्या मुळा नदीजवळ मांगमळीत रविवारी (११ ऑगस्ट) रात्री काही ग्रामस्थांना त्यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले होते. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर व सुभाष बोडखे घटनास्थळी पोहोचले.

online gambling, youth suicide Virar,
ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी, गुजरातमधील तरुणाची विरारमध्ये आत्महत्या
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
person who stole jewellery from devotees was arrested in Lalbagh
लालबागमध्ये भाविकांचे दागिने चोरणाऱ्याला अटक, आरोपी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी
Death mother daughter Gondia, snake bite Gondia,
गोंदिया : सर्पदंशाने मायलेकींचा मृत्यू
Minor girl murder Jalgaon, girl murder torture,
जळगावमध्ये अल्पवयीन मुलीची अत्याचारानंतर हत्या
Thane Suicide youth, highly educated youth thane,
ठाणे : उच्च शिक्षित तरुणाची आत्महत्या
police crack double murder case in savare village of palghar taluka
पालघर : घरगुती वादातून माय लेकीची निर्घुण हत्या; आरोपी दिर आणि नणंद यांना अटक
Two brothers drowned, Nandurbar taluka,
नंदुरबार तालुक्यात दोन भावांचा बुडून मृत्यू

हेही वाचा : Puja Khedkar: पूजा खेडकर यांच्या अटकेबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निकाल; २१ ऑगस्टपर्यंत…

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरला पाठविले आहे. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या नेमक्या कारणांचा उलगडा होईल. अवघ्या दोन-तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेले हे नव दाम्पत्य पुण्यात नोकरी करत होते. मात्र त्यांनी गावाकडे साकुरला येत रविवारी रात्री आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.