बीड : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव खासगी बस उलटून झालेल्या अपघातात सहा प्रवासी ठार झाल्याची घटना गुरुवारी पहाटे आष्टी फाटा ( ता. आष्टी ) येथे घडली. तर भरधाव रुग्णवाहिका मालमोटारीवर आदळून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड अहमदनगर राज्य महामार्गावरील दौलावडगाव येथे बुधवारी रात्री उशिरा घडली. दोन्ही अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी पहाटे दोन अपघातांच्या वृत्ताने जिल्हा हादरला आहे. दरम्यान घटनास्थळी आमदार सुरेश धस यांनी भेट देऊन माहिती घेतली असून जखमींना उपचारासाठी पाठविले.

हेही वाचा : ‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे!’ साताऱ्यात शासकीय अधिकाऱ्याच्या फलकाची चर्चा

बीड जिल्ह्यातील अंभोरा ( ता. आष्टी ) हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ मालमोटार ( क्र. MH २१ X ८६०० ) हा धामणगाव ( ता. आष्टी ) कडून अहमदनगर दिशेने जात होता. बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास व्यंको कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना रुगणवाहिका (क्र. MH-१६ Q ९५०७) ने मालमोटारील पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे, ( वय ३५, रा. धामणगाव ता. आष्टी ), मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे ( दोन्ही रा. जाट देवळा, ता. पाथर्डी ) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर डाॅ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के, ( वय ३५, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी ) यांचा अहमदनगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याच बरोबर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे ( वय ४५, रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी ) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा : Maharashtra Breaking News Live : “पंतप्रधान मोदी वारंवार महाराष्ट्र दौरे करत आहेत, कारण…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दुसरा अपघात बुधवार दि.२६ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजता मुंबईकडून बीडकडे येते असलेल्या सागर ट्रॅव्हल्स या खासगी बसच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आष्टा फाटा ( ता. आष्टी ) येथे नजीक घडला. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.