ऐतिहासिक घोटाळे हे जे युपीएच्या सरकारच्या कार्यकाळात झाले तेवढे स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही झाले नव्हते. अशा प्रकारची अवस्था देशात पाहिली. त्यानंतर मोदींचं सरकार आल्यानंतर मागच्या नऊ वर्षांमध्ये अतिशय गतिमान निर्णय प्रक्रिया पाहिली. प्रचंड विकास आपण पाहिला. कुठल्याही प्रकारे एक डाग या सरकारवर कुणीही लावू शकलं नाही. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभी केली. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास कामांचा पाढा वाचला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या पत्रकार परिषदेच्या आधी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

तंत्रज्ञानाचा उपयोग करुन गरीब कल्याणाचा अजेंडा चालवत असताना गरीबांपर्यंत त्यांचे अधिकार पहिल्यांदा पोहचवण्याचं काम या देशात मोदींच्या नेतृत्वात झालेलं आपण बघितलं. खरं म्हणजे एकूणच या देशात विविध योजना ज्या मोदींच्या नेतृत्वात सुरु झाल्या त्याचा फायदा अनेकांना मिळाला. महाराष्ट्राचा विचार केला तरी महाराष्ट्रात करोनाच्या काळात जवळपास १७ कोटी ७९ लाख डोसेस हे महाराष्ट्रातल्या जनतेला मोफ दिले गेले. प्रधानमंत्री आवास योजनेत २५ लाखांहून अधिक घरं बांधून तयार झाली. जलजीवन मिशनच्या अंतर्गत १ कोटी ११ लाख घरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा नळ हा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर पोहचला. अजूनही यावर काम सुरु आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पीएम उज्वला योजनेच्या अंतर्गत जवळपास ३८ लाख ९० हजार बेनिफिशरीजना फायदा झाला. आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत ७१ लाख गरीब लोकांना पाच लाखांपर्यतचे मोफत उपचार देणं सुरु झालं. पीएम किसान सन्मान योजना यामध्ये शेतकऱ्यांना थेट सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात दिले जातात. महाराष्ट्र सरकारनेही यामध्ये सहा हजार रुपये द्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे १२ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. १ कोटी १० लाख १४ हजार ७३८ शेतकऱ्यांना याचा फायदा मिळाला आहे. त्याचप्रमाणे कौशल विकास योजना यामधून १० लाख २७ हजार युवकांना फायदा झाला. पीएम फसल बीमा योजना याचा फायदा ८७ लाख शेतकऱ्यांना झाला. रस्त्यावर काम करणारा पान टपरीवाला, ठेलेवाला अशा स्ट्रीट व्हेंडर्सना जवळपास ५ लाख स्ट्रीट व्हेंडर्सना मदत मिळाली. याचा दुसरा टप्पाही सुरु आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुद्रा योजनेतून ४१ लाख ५८ हजार उद्योजकांना लाभ झाला. ते आपल्या पायावर उभे राहिले. जे रोजगार स्वयंरोजगाराविषयी बोलतात त्यांना सांगू इच्छितो. एकट्या महाराष्ट्रात ४१ लाख लोकांना मुद्रा योजनेचा फायदा झाला आहे. अटल पेन्शन योजनेचा ४० लाख लोकांना फायदा झाला आहे. ही यादी खूप मोठी आहे. महाराष्ट्रातल्या चार कोटी कुटुंबाना मोफत अन्न मोदींनी उपलब्ध करुन देलं आहे. गरीब कल्याणचा अजेंडा राबवत असताना केंद्राच्या मदतीने सरकार जी कामं करत केली जात आहेत. ही कामं ९ वर्षांपासून झाली नव्हती असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एकीकडे विकास आणि दुसरीकडे सामान्य माणसाचं कल्याण असं काम करणारं मोदी सरकार असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे. २०१४ पूर्वीचा भारत वेगळा होता. २०२३ ला आम्ही नव्या भारताची निर्मिती पाहतो आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.