रत्नागिरी: राजापूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी रात्री राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा पुन्हा एकदा फटका पडला आहे. गुरुवारी मध्यरात्रीच अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे शुक्रवारी पहाटे जवाहर चौक पाण्याखाली गेला. व्यापा-यांनी आधीच दक्षता घेतल्याने मोठी आर्थिक हानी झाली नाही.

राजापूर तालुक्यात रविवारी पडळेल्या मुसळधार पावसाने राजापूर शहरात पुराचे पाणी शिरले होते. शहरात आतापर्यंत पाच वेळा पाणी भरल्याने चांगलीच व्यापा-यांची दमछाक झाली आहे. मात्र सोमवार पासून पावसाने उसंत घेतली असली तरी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सरींवर बरसत होता. गुरुवारीही दिवसभर पाऊस सरींवर बरसत असल्याने सायंकाळी शहरातून वाहणाऱ्या कोदवली व अर्जुना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे पुराची शक्यता लक्षात घेवून नागरिक व व्यापारीवर्गाने अगोदरच दक्षता घेतली होती.

हेही वाचा : समुद्राच्या लाटांचा गणपतीपूळे येथील गणपती मंदिराला तडाखा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढल्याने पहाटे पुराचे पाणी जवाहर चौकाच्या दिशेने यायला सुरुवात झाली होती. सकाळी संपुर्ण जवाहर चौक पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. राजापूर शहरातील चिंचबांध मार्गे शीळ गोठणेकडे जाणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतुक बंद झाली आहे. तर शहराच्या अन्य भागातही काही ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. शुक्रवारी सकाळ पासून पावसाने पुर्णतः उघडीप घेत असून उन्ह पाडले असले तरी पुराचे पाणी अद्यापही जवाहर चौकात ठाण मांडून असल्याने एसटी सेवा बंद ठेवण्यात आली. यामुळे प्रवासांचे चांगलेच हाल झाले.