सांगली : दहा वर्षांपासून पत्नीसह फरार असलेल्या जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागातील अभियंता राहूल खाडे यांने भ्रष्टाचार करुन कोटीहून अधिक मालमत्ता भ्रष्ट मार्गाने कमविली असल्याचे लाचलुचपत विभागाच्या चौकशीत आढळले. याप्रकरणी अभियंता खाडेसह पत्नी व मुलीविरुध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उप अधिक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी सांगितले.

अभियंता खाडे हा शाखा अभियंता म्हणून छोटे पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद सांगली येथे कार्यरत आहे. कार्यरत असताना खाडेनी भ्रष्ट व गैर मार्गाचा अवलंब करुन अपसंपदा कमवली असल्या बाबतचा तक्रारी अर्ज लाचलुचपत विभागाच्या कार्यालयास प्राप्त झाल्या होता.

हेही वाचा…युवा संमेलनात अमित शहा यांचा ‘राजकीय सूर’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अर्जाच्या अनुषंगाने खाडे यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली. यामध्ये अभियंता खाडे, पत्नी सरोजिनी खाडे व मुलगी विशाखा खाडे यांनी दि.७.११.१९८९ ते दि.२८.२.२०१५ या परिक्षण कालावधीत ज्ञात उत्पन्न स्त्रोतापेक्षा अधिक ९३ टक्के म्हणजे १ कोटी, २ लाख, ११३ इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केली असल्याचे निष्पन्न झाले. खाडे यांनी भ्रष्ट व गैर मार्गाने कमवलेली अपसंपदा धारण करण्यास त्यांची पत्नी व मुलीने अपप्रेरणा दिली असल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाल्याने तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान खाडे व पत्नीविरोधी यापुर्वी जुलै २०१० मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात जामीनावर मुक्त झाल्यापासून पती-पत्नी दहा वर्षापासून फरार आहेत.