सांगली : नातीला मारू नकोस असे सांगितल्याने मुलाने आईवर तलवारीने वार करण्याचा प्रकार लिंगणूर (ता. मिरज) येथे बुधवारी घडला असून गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच संशयिताने आई लपून बसल्याच्या संशयाने बहिणीचे घरही पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. प्रदीप उर्फ यशवंत आण्णाप्पा नाईक (वय २४) हा आपल्या मुलीला मारहाण करीत होता. यावेळी त्यांची आई तथा मुलीची आज्जी यल्लवा नाईक यांनी अडविण्याचा प्रयत्न करीत मुलीला मारू नकोस असे सांगितले.

हेही वाचा : “सगळेच गद्दार, अजित पवार गट ‘खोके-खोके’ म्हणायचे, आता तेच…”, बच्चू कडूंचं मोठं विधान

rod attack on st bus conductor marathi news
बारामतीमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपुरात एसटी वाहकावर रॉडने हल्ला…
shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
man killed in dispute between two groups over trivial reason in thane
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या

त्यावेळी प्रदीपने हातातील काठीने त्याच्या आईला मारहाण केली. तसेच तलवार घेऊन तुला जिवंत सोडणार नाही, म्हणत आईवर पाच ते सहा वार केले. महिलेच्या दोन्ही पायावर व मांडीवर हे तलवारीचे वार बसले असून यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. यानंतर मुलाच्या तावडीतून सुटून लपून बसल्या असता मुलगी सीमा राजू नाईक यांच्या घरी जाऊन आरोपीने आई कुठे आहे, अशी विचारणा करीत दारात असलेले पाण्याचे बॅरेल फोडून दरवाजावर दगडफेक केली. तसेच घरातील संसारोपयोगी साहित्य, ३५ हजारांची रोकड घेऊन पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल केला असून उप अधिक्षक प्रणिल गिल्डा यांनीही घटनास्थळी भेट देऊन जळीत घराची पाहणी केली. संशयीत आरोपीस रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.