वाई : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे ३ मार्चला साताऱ्यात पक्षाचा महामेळावा घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचा निर्धार मुंबईत झालेल्या आमदार व पदाधिकारी यांच्या बैठकीत करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक मुंबईत प्रदेश राष्ट्रवादी भवनात झाली. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष अमित कदम, सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर अमित देशमुखांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “आमची…”

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election 2024
विजय शिवतारे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना शब्द; म्हणाले, “बारामतीच्या विजयामध्ये पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल”
Chandrashekhar Bawankule
औषधी संचावर पंतप्रधानांचा फोटो का नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा पुण्यातील पदाधिकाऱ्यांना प्रश्न
Assembly Speaker Rahul Narvekars letter to Chief Minister to Change the name of Alibaug
अलिबागचे नाव बदला, विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सर्वांनी सातारा व माढा लोकसभेसाठी महायुतीच्या जागा वाटपात आपण आग्रही राहण्याची मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी आपण स्वतः सातारा लोकसभेसाठी आग्रही आहोत, कोणत्याही परिस्थितीत आपण ही जागा घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माढा लोकसभेसाठी संजीवराजे नाईक निंबाळकर हे इच्छुक असून त्यासाठीही आग्रह धरण्याबाबत चर्चा झाली. पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळाले असल्याने साताऱ्यात पक्षाची बांधणी, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत व ताकतीने उभे करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना केली. तसेच येत्या तीन मार्चला साताऱ्यात पक्षाचा महामेळावा घेऊन लोकसभेचे रणशिंग फुंकण्याचा निर्धार यावेळी त्यांनी केला.

हेही वाचा : “भाजपाने नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवलं, दहशत निर्माण करून पक्ष फोडले”, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

सातारा लोकसभेसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व माढा लोकसभेसाठी राम राजेंचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर इच्छुक आहेत. त्यामुळे हे मतदारसंघ मिळण्यासाठी ताकत लावण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी शशिकांत पिसाळ, बाळासाहेब सोळसकर, नितीन भरगुडे पाटील, उदय कबुले, प्रमोद शिंदे, मनोज पोळ, नंदकुमार मोरे, शिवाजीराव महाडिक, राजाभाऊ उंडाळकर, राजेश पाटील- वाठारकर, सुरेंद्र गुदगे, नितीन भिलारे, प्रदीप विधाते, राजेंद्र राजपुरे, संजय गायकवाड, दत्ता नाना ढमाळ, राजेंद्र तांबे , महादेव मस्कर, सुरेश साळुंखे, मनोज पवार, भाई डोंगरे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.