वाई : साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये परदेशी नागरिकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सातारा येथील एका कारखान्यात जर्मनीतील एका कंपनीचे काम सुरू आहे. युक्रेनचे नागरिक असलेले कोव्हिडीनि फॉलुस्की (वय ३९ वर्ष) हे कारखान्यात देखरेख करण्यासाठी जर्मन कंपनीकडून आले होते. मागील १० ऑक्टोबर पासून त्यांचा साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये मुक्काम होता. रविवार दुपारनंतर कोव्हिडीनि आणि कंपनीचा कोणताही संपर्क होत नव्हता. यामुळे कंपनीने सातारा शहर पोलिसांना याबाबत कळविले.

हेही वाचा : “मराठा आरक्षणाला विरोध नाही पण…”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य चर्चेत

पोलिसांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या हॉटेलच्या खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी ते मृत अवस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या मृत्यूची माहिती संबंधित राजनैतिक अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महेंद्र जगताप अधिक तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.