सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर अज्ञाताने एक कोटी ४० लाख रुपयांची रक्कम लांबविल्याचा गाडीचालकाचा बनाव भुईंज (ता. वाई) पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी चालकासह सीआयडीच्या हवालदारावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश शिवाजी पाटील (पाचगाव, कोल्हापूर) व अभिजित शिवाजीराव यादव (पिरवाडी, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत मनोज मोहन वाधवानी (ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांनी भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हेही वाचा : Rohit Pawar : खेड-शिवापूरमध्ये ५ कोटींची रक्कम जप्त, रोहित पवारांनी व्हिडीओ शेअर करत सत्ताधाऱ्यांना दिला इशारा; म्हणाले, “लक्षात ठेवावं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाधवानी यांनी आपली मोटार पाटील याच्याकडे देत पुण्यातील व्यापाऱ्याकडून सुमारे एक कोटी ४० लाख घेऊन येण्यास सांगितले होते. ती रक्कम घेऊन येताना चालक पाटील याने पाचवड (ता. वाई) येथून पोलीस पाठलाग करीत असल्याचे तसेच यांनतर मोटार रस्त्याच्या बाजुला लावत आपण पळून गेलो. थोड्यावेळानंतर आल्यावर मोटारीतील रक्कम गायब झाल्याचे वाधवानी यांना सांगितले. याबाबत वाधवानी हे चालक पाटील याच्यासह भुईंज ठाण्यात हजर झाले. त्या वेळी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व पतंग पाटील यांनी नीलेश पाटील याच्याकडे चौकशी केली असता, त्याने ती रक्कम त्याचा मित्र सीआयडी हवालदार अभिजित पाटील याच्या मदतीने लांबवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.