सोलापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आला. हळूवारपणे त्याची यशस्वीपणे अंमलबजावणीही होत आहे. परंतु या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह समाज प्रबोधनासाठी अंनिसची चळवळ आणखी व्यापक करण्याचा निर्धार महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला.

महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटकातही जादूटोणाविरोधी कायदा आणण्यात आला. परंतु तेथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी चळवळ आणि कार्यकर्त्यांचे जाळे नसल्यामुळे अडचण आहे. केवळ कायदा करून उपयोग नाही तर त्याची यशस्वी अंमलबजावणी करणे जास्त महत्त्वाचे असते, अशी अपेक्षा मुक्ता दाभोळकर यांनी या बैठकीत व्यक्त केली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : सांगली: रेंगाळलेल्या रेल्वे पूलाच्या कामाचे श्राद्ध

सोलापुरात हिराचंद वाचनालयाच्या सभागृहात शालिनी ओक मंचावर दोन दिवस चाललेल्या महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीस १९ जिल्ह्यांतील दोनशे प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधील विविध विभागांचा अहवाल, कार्य आणि पुढील नियोजन याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात असणारा जादू टोना विरोधी कायदा, त्याची अंमलबजावणी, आंतरजातीय सहाय्य विभाग, आंतरजातीय जोडप्यांसाठी चालवण्यात येणारे सेफ हाऊस, मानसिक आरोग्य विभाग, युवा व महिला विभाग, विविध उपक्रम विभाग इत्यादी कार्यावर चर्चा व नव्या कल्पना मांडण्यात आल्या.

पहिल्या दिवशी या कार्यकारिणी बैठकीची सुरूवात माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर खून खटला निकाल विशेषांकाच्या प्रकाशनाने झाला. शोषणाला विरोध हा अंनिस आणि कामगार चळवळुमधला समान धागा असल्याचे मत आडम यांनी मांडले. दुस-या दिवशी सकाळी ‘ निर्भय मोर्निग वॉक ‘ काढण्यात आला, हिराचंद नेमचंद कार्यालय येथून सम्राट चौक येथे कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन त्यानंतर पुढे आंबेडकर उद्यानापर्यंत हा मॉर्निंग वॉक काढला. या माॕर्निंग वाॕकमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अमर रहे, माणूस मारता येतो विचार मारता येत नाही, लढेंगे जितेंगे, आवाज दो हम एक है इत्यादी घोषणा देण्यात आल्या. सहभागी नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत या मॉर्निंग वॉकमध्ये सहभाग नोंदवला.

हेही वाचा : मुरलीधर मोहोळांचा सुप्रिया सुळेंना टोला, “सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांची मळमळ…”

डॉ हमीद दाभोलकर म्हणाले, डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या खून खटल्याचा अर्धा मुर्धा निकाल लागला असला तरी आम्ही काही प्रमाणात त्यावर संतुष्ट आहोत. सूत्रधार पकडले जावेत यासाठी ही न्यायाची लढाई चालूच राहणार आहे. जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी यापुढेही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसंवाद यात्रेसह कायद्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी अधिक सक्रीय राहण्याचा निर्धार करण्यात आला.

हेही वाचा : सांगली: चार शतकांचा साक्षीदार असणारा वटवृक्ष कोसळला

या बैठकीच्या समारोप सत्रात ज्येष्ठ शल्यचिकित्सक सर्जन डॉ, बी. वाय, यादव (बार्शी), लेखक डॉ. अर्जुन व्हटकर, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कृष्णा मस्तुद उपस्थित होते. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी सुरू केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा व्यापक आढावा आणि चिंतन यावेळी करण्यात आले. राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव, अण्णा कडलसकर, फारुख गवंडी, डॉ अशोक चव्हाण तसेच सोलापूर शाखेचे डॉ अस्मिता बालगावकर, उषा शहा , शंकर खलसोडे, लालनाथ चव्हाण, अंजली नानल, मधुरा सलवारू, निशा भोसले, डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, व्ही. डी, गायकवाड, आर. डी. गायकवाड आदी उपस्थित होते

Story img Loader