सोलापूर : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लादलेली बंदी, अवकाळी पावसाची भीती आणि कांदा लिलाव एकदिवसाआड बंद होत असल्यामुळे सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत कांद्याची होणारी प्रचंड आवक सुरूच असून शुक्रवारी तब्बल एक लाख ४० हजार क्विंटल एवढा विक्रमी कांदा दाखल झाला. परंतु दर घसरण प्रतिक्विंटल एक हजार ते दीड हजार रूपयांपर्यंत आले आहेत. त्यामुळे प्रचंड आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांना चिंतेने ग्रासले आहे. सोलापूर कृषिउत्पन्न समितीचा परिसर ३०५ एकरपेक्षा जास्त सर्वत्र कांदाच कांदा दिसत आहे. त्याचा फटका सीताफळ,पेरूसारख्या लिलावाला बसून त्यांचेही दर कोसळले आहेत. गेल्या १०-१५ दिवसांपासून सोलापुरात कांद्याची आवक वाढल्यामुळे बाजार समितीचे नियोजन कोलमडले आहे.

बाजारात कांदा ठेवायलाही जागा अपुरी पडू लागल्यामुळे दररोज नियमित होणारा कांदा लिलाव एक दिवसाआड बंद ठेवावा लागत आहे. परंतु त्याचा फटका व्यापा-यांपेक्षा शेतक-यांनाच बसत आहे. गेल्या महिन्यात प्रतिक्विंटल पाच हजार रूपये दर मिळालेला कांदा आता चक्क एक हजार ते दीड हजार रूपयांपर्यंत विकण्याची पाळी शेतक-यांवर आली आहे. यात उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतक-यांच्या डोळ्यात दिसून आले. एकीकडे दर घसरण सुरूच असताना दुसरीकडे शुक्रवारी दाखल होणारा कांदा वाहनातून उतरून घेण्यासाठी प्रति ५० किलोच्या पिशवीमागे एक रूपयाची वाढ मिळण्यासाठी ऐनवेळी हमालींनी आक्रमक पवित्रा घेऊन शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण केला.रात्री बराच वेळ कांदा उतरून घेण्याचे काम थांबविण्यात आले होते.

हेही वाचा : सांगली : सुधारीत टेंभू योजनेला शासनाची मंजुरी; ५३ गावांसाठी लाभदायी

तेव्हा कृषिउत्पन्न समितीनेही हमालीत एक रूपयाची वाढ करून प्रति ५० किलो कांद्याच्या पिशवीमागे चार रूपये हमाली देण्यास शेतक-यांना भाग पडले. एकीकडे बाजार समिती परिसरात असुरक्षित वाणवरणामुळे दररोज शेतक-यांनी आणलेल्या सरासरी दोन हजार क्विंटल कांद्याची चोरी होते. तर दुसरीकडे कांद्याचे दर कोसळणे सुरूच राहिल्यामुळे शेतकरी चौफेरा अडचणीत येत आहे. गुरूवारी रात्रीपासून दाखल होणारा कांदा शुक्रवारी दुपारपर्यंत येतच राहिल्यामुळे दुपारी दोननंतर कांदा लिलाव सुरू झाला. रात्रीपर्यंत लिलाव सुरूच होता. लिलाव सुरू होण्यापूर्वीच दर कोसळण्याच्या भीतीमुळे शेतक-यांच्या चिंता दिसत होती.

हेही वाचा : सांगली : मुलीला पळवून नेण्याच्या प्रयत्न; परप्रांतीय तरुणास ५ वर्षे सश्रम कारावास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजारात कांद्याची प्रचड आवक होत असल्यामुळे कांदा साठविण्यास जागा अपुरी पडत आहे. फळेभाज्या, भुसार माल व अन्य विभागातही कांदा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अन्य मालाचा लिलाव होण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्याचा फटका सीताफळ व पेरूसारख्या फळांच्या व्यवहाराला बसत आहे. पेरू व सीताफळाचा लिलाव न होता गुत्त्यावरच खरेदी-विक्री झाली. एरव्ही, प्रतिकिलो ४० रूपये किलो दर असलेल्या पेरूला २० रूपये भाव मिळाला, तर सीताफळालाही निम्माच म्हणजे प्रतिकिलो अवघा १० रूपये दर मिळाला.