सोलापूर : सोलापूरसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला वळविण्यात आल्याच्या आरोपानंतर त्यास सोलापूरकरांना विरोध उघड होऊ लागला. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनीही या प्रश्नावर आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला असताना शेवटी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोलापूर भेटीत हा इशारा गळून पडला.

हेही वाचा : ४ राज्यांच्या निकालानंतर तुम्ही इंडिया आघाडीबरोबर जाण्यास इच्छुक आहात? प्रकाश आंबेडकर म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रकांत पाटील यांनी तर, एखाद्या प्रश्नावर राजीनामा देण्याची भाषा केली जाते. प्रत्यक्षात राजीनामा कोणी देत नसतो, अशा शब्दात आमदार देशमुख यांना घरचा आहेर दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अनेक मराठा आमदारांनी राजीनामा देण्याची भाषा वापरली. परंतु कुणीही राजीनामा दिला नाही. राजीनामा देतो, हे राजकारणात ठरलेले शब्द असतात. ते कधीही खरे समजायचे नसतात, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी काही उदाहरणांची जोड दिली.