सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची सभा करमाळा तालुक्यातील दिवे गव्हाण येथे झाली. परंतु, या सभेला अपेक्षित जनसमुदाय हजर नव्हता. त्यामुळे जरांगे यांचा पूर्वीचा प्रभाव आता ओसरू लागल्याचे मानले जात आहे. दिवे गव्हाण येथील जरांगे-पाटील यांची सभा पूर्वनियोजित होती. त्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित राहण्याची अपेक्षा गृहीत धरून १९ एकर क्षेत्राएवढ्या मैदानावर नियोजन केले जात होते. परंतु, भर दुपारी रणरणत्या उन्हात ठरलेल्या सभेसाठी अपेक्षित गर्दी होणार नाही, याचा विचार करून पाच एकर मैदानावर सभेची तयारी झाली. तरीही अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, पारनेरमार्गे जरांगे यांना करमाळ्यात सभास्थानी पोहोचायला सुमारे दोन तासांचा विलंब झाला. प्रत्यक्ष सभेला हजाराचाही जनसमुदाय उपस्थित नसल्याचे पाहून जरांगे यांचा मूड गेला. त्याबद्दल त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली नसली तरी ३५ किलोमीटर अंतरावरील सभास्थानी येताना रस्ता अतिशय खराब असल्यामुळे खूप त्रास झाला. ज्या मोटारचालकाने आपणांस या खराब रस्त्याने तुडवत आणले, त्याला माझ्यासमोर आणा अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : बारामती लोकसभेबाबत विजय शिवतारेंची मोठी घोषणा, म्हणाले, “१२ तारखेला १२ वाजता…”

Ajit pawar faction threatens to walk out of Mahayuti
“.. तर महायुतीमधून बाहेर पडू”, अजित पवार गटाचा आता निर्वाणीचा इशारा
Nitish Bharadwaj Second Wife Ias Officer Smita Ghate
“१३ वर्षे शारीरिक संबंध नाही, मी पुण्याला…”, नितीश भारद्वाज यांचं विधान; म्हणाले, “मला घटस्फोट हवाय, कारण…”
Sharad pawar udyanraje bhosle satara lok sabha election
उदयनराजेंना महायुतीने डावललं तर तुम्ही तिकीट देणार का? शरद पवारांनी कॉलर उडवत दिलं उत्तर…
MLA Nilesh Lanke resign
निलेश लंकेंनी लोकसभेसाठी अखेर राजीनामा दिला; भावूक होत म्हणाले, “पवार साहेबांना त्रास दिला…”

इकडे दुसऱ्या दिवशी आंतरवली सराटीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण प्रश्नी आठ-दहा मुद्यांवर भूमिका ठरविण्यासाठी महत्वाची बैठक होणार असल्यामुळे करमाळ्यातील सभेत जरांगे यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले असावे, अशी चर्चा मराठा वर्तुळात ऐकायला मिळाली. दुसरी बाब म्हणजे मनोज जरांगे यांच्या सभा अलिकडे सोलापूर जिल्ह्यात मोहोळ, शेटफळ, वैराग (ता. बार्शी) आदी ठिकाणी झाल्या होत्या. त्यांच्या भाषणात तोच तोचपणा असल्यामुळे कदाचित करमाळ्याच्या सभेकडे मराठा समाजाने पाठ फिरविली असावी, असेही मत व्यक्त करण्यात आले.

हेही वाचा : नीट, एमएचटी-सीईटी एकाच दिवशी, सीईटी सेलवर दोनच दिवसांत पुन्हा वेळापत्रक बदलण्याची वेळ!

करमाळ्यात जरांगे-पाटील यांनी कमी प्रतिसाद मिळालेल्या सभेत अवघ्या पाच मिनिटांत भाषण आटोपते घेतले. कारण दुसऱ्या दिवशी आंतरवली सराटीत मराठा आरक्षण प्रश्नावर मोठी बैठक असल्याने आणि त्या बैठकीत महत्वाच्या आठ-दहा मुद्यांवर भूमिका ठरणार असल्यामुळे जरांगे हे करमाळ्यातील सभेत अधिक तपशीलवार भाषण करणे शक्त नव्हते, हेही कारण दिले जात आहे. यापूर्वी गेल्या नोव्हेंबरमध्ये अगदी पहाटे चार वाजता कडाक्याच्या थंडीत जरांगे-पाटील यांची सभा याच करमाळा तालुक्यातील वांगी येथे झाली होती. तरीसुध्दा थंडी झेलत हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. पहाटे चार वाजता कायदा धाब्यावर बसवून झालेल्या त्या सभेची पोलीस प्रशासनाने दखल न घेता फौजदारी कारवाई करण्याचे टाळले होते. त्या तुलनेत दिवे गव्हाणमध्ये झालेल्या सभेला अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे जरांगे-पाटील यांचा प्रभाव ओसरू लागल्याचेही बोलले जात आहे.