सोलापूर : एकीकडे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे आव्हान पेलण्यासाठी भाजपने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देताच त्यांच्यात सुरू झालेल्या ‘लेटर वॉर’मुळे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे सोलापूरच्या तापमानाचा पारा ४०.६ अंशावर गेला आहे.

काल रविवारी सोलापूरचे तापमान ४० अंश सेल्सियसवर नोंद झाले होते. तसे पाहता चालू मार्चमध्ये सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा चाळिशीच्या दिशेने सरकत असताना गेल्या १६ मार्च रोजी ४०.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर त्यात काही घट होत गेली तरीही उष्म्याची धग कायम होती.

future of the Nashik Lok Sabha seat depends on Thane the rift remains
नाशिकच्या जागेचे भवितव्य ठाण्यावर अवलंबून, तिढा कायम
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव

हेही वाचा – साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

हेही वाचा – नीट, एमएचटी-सीईटी एकाच दिवशी, सीईटी सेलवर दोनच दिवसांत पुन्हा वेळापत्रक बदलण्याची वेळ!

हेही वाचा – सोलापूर : माढ्यात भाजपचा उमेदवार बदलण्यासाठी शिवसेनेचाही दबाव

सकाळी नऊपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत असताना दुपारच्या रणरणत्या उन्हाच्या झळा असह्य ठरू लागल्या आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत असताना तापलेल्या राजकीय वातावरणातच तापमानाचा पारा वरचेवर वाढू लागल्यामुळे नागरीक हैराण होत आहेत.