सोलापूर : भांडणामुळे दुरावलेल्या आणि शरीर संबधास नकार देणाऱ्या पतीला धडा शिकविण्यासाठी पत्नीने त्याचे गुप्तांगच चाकूने कापल्याची घटना बार्शी शहरात उजेडात आली आहे. यासंदर्भात बार्शी शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमलेश काकासाहेब सांगळे ( वय २४, रा. घाटशिरूर, ता. केज जि. बीड ) हा तरूण मोबाईल शॉपी चालवीत असताना आलेल्या संपर्कातून त्याचे एका विवाहित महिलेशी प्रेम झाले, नंतर प्रेमाचे रूपांतर विवाहात झाले. मात्र पुढे दोघांमध्ये जमेना. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी कमलेश कोणालाही न सांगता बार्शी तालुक्यातील नातेवाईकाकडे येऊन राहिला होता. तो बार्शीत असल्याचे समजल्याने पत्नीने कमलेश यास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला.

हेही वाचा : “शत्रूच्या दारात जाऊन…”, पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी वाढल्यानंतर पंकजा मुंडेंचं विधान; म्हणाल्या…

girl from andheri robbed by throwing inflammable
कल्याणमध्ये अंधेरीतील तरूणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून लुटले
tiger attacked and killed young man in forest
तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेला अन् वाघाची शिकार झाला
Kalyan, jeans making factories, Chinchpada, Dwarli area, kdmc, resident, pollution issue
कल्याणमधील चिंचपा़डा, व्दारली येथील हरितपट्ट्यावरील जीन्सचे ३२ कारखाने जमीनदोस्त, प्रदुषणाने परिसरातील नागरिक होते त्रस्त
Chandrapur, Woman died, tiger attack,
चंद्रपूर : वाघाने घेतला महिलेचा घास, तेंदूपत्ता गोळा करत असताना…
Death of a passenger, Shahapur,
टिटवाळा येथे लोकल हल्ल्यातील शहापूर जवळील प्रवाशाचा मृत्यू, दोन हल्लेखोरांना अटक, दोन जण फरार
Washim, Vehicle accident,
वाशिम : लग्नसमारंभासाठी जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात दोन ठार
pune, woman s husband, Husband Sets Fire to 15 Bikes, Fire to 15 Bikes, Teach Mother in Law a Lesson, mother in law, husband wife dispute, husband mother in law dispute, crime news, fire brigade, bikes fire, fire news, marathi news,
धक्कादायक : पत्नी, सासूला धडा शिकवण्यासाठी १५ दुचाकी जाळल्या
mumbai, Two Workers Die, One Critical, Falling into Toilet Tank, malad, pimpripada, Construction Site, marathi news, malad news, mumbai news, workers fell tank in malad
मालाडमध्ये शौचालयाच्या टाकीत उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

दोघांत ठरल्याप्रमाणे पत्नी बार्शीत आली. दुपारी बार्शी बस स्थानक परिसरातील असलेल्या एका लॉजमध्ये दोघे गेले असता पत्नीने शरीरसंबधासाठी आग्रह केला. परंतु कमलेश याने नकार दिल्यामुळे चवताळलेल्या पत्नीने त्याच्यावर हल्ला केला. त्याचा शर्ट फाडून त्याच्या तोंडावर टाकला आणि त्याला निर्वस्त्र करीत धारदार शस्त्राने त्याते गुप्तांगच कापून काढले. यात गंभीर जखमी अवस्थेत कमलेश यास बार्शीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार हा खुनाचा प्रयत्न असल्याने बार्शी शहर पोलिसांनी कमलेशच्या पत्नीविरूध्द खुनाच्या प्रयत्नाबद्दल गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे.