रायगड जिल्ह्यात आíथक आणि सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढत झाली आहे. राज्यातील इतर भागांप्रमाणेच रायगडातही वेगवेगळ्या योजनांची प्रलोभने दाखवून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे फसव्या योजनांपासून सावध राहण्याचा सल्ला पोलीस प्रशासनाकडून दिला जात आहे.
कधी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून, कधी पिग्मीच्या माध्यमातून पसे गोळा करून, तर कधी कंपन्यांची महागडी उत्पादने अल्प किमतीत देतो सांगून ग्राहकांची फसवणूक केली आहे. अलीकडच्या काळात ऑनलाइन लॉटरी, एटीएम पिन, बँक व्हेरिफिकेशनच्या नावाखाली अनेक ग्राहकांची लूट झाल्याचे समोर आले आहे.
‘शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा व १० टक्के मासिक नफा मिळवा’ अशा प्रकारची जाहिरातबाजी करून अनेक गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा घालून पसार झालेल्या अलिबाग शहरातील मनीगुरूला पोलिसांनी नुकतेच गजाआड केले आहे. डिसेंबर २०१४ ते १ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत ठाणे, भाईंदर येथील एका भामटय़ाने अलिबाग शहरातील पीएनपीनगर येथे मनीगुरू नावाने गुंतवणूक आणि आíथक सल्लागार म्हणून दुकान थाटले.
चांगला नफा मिळेल या प्रलोभना पोटी अनेकांनी गुंतवणूक केली. सुरुवातीला कराराप्रमाणे दोन महिन्यांचा मासिक परतावा त्याने दिला. मात्र त्यानंतर पसे देण्यास टाळाटाळ सुरू झाली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह घरगुती वापराच्या वस्तू मोठी सूट देतो सांगून अलिबागकरांना लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे आणखी एक प्रकरण २०१४ मध्ये समोर आले होते. अलिबाग शहराला लागून असलेल्या चेंढरे परिसरात २ गाळे भाडय़ाने घेऊन मे. सरावना ट्रेडर्स या नावाने दुकान सुरू करण्यात आले होते. दुकानात टीव्ही, फ्रिज, वॉिशग मशीन, एअर कंडिशनर, यांसह घरगुती वापराची भांडी विकण्यासाठी ठेवण्यात आली होती. प्रत्येक वस्तूवर पहिल्या २५ ग्राहकांसाठी ४५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली होती. ज्या दिवशी पसे भरून बुकिंग करण्यात येईल त्यानंतर १० दिवसांनी वस्तू देण्यात येईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले होते. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला काही जणांना वस्तू देण्यात आल्या. त्यानंतर अलिबागकरांनी जोरदार बुकिंग केल्यानंतर लाखो रुपयांचा चुना लावून ही टोळी पसार झाली.
महाड, बिरवडी आणि गोरेगाव परिसरातील अनेक ग्राहकांना ऑस्कर मॅनेजमेंट सíव्हसेस या नॉनबँकिंग कंपनीने कोटय़वधींचा गंडा घातल्याची बाब आता समोर आली आहे. कंपनीचे शाखा प्रबंधक संपत झांजे यांनी महाड पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.
जिल्ह्यात बक्षीस आणि लॉटरीचे आमिष दाखवून ३ जणांना, एटीएम कार्डाची माहिती मागून २४ जणांना, तर मोबाइल टॉवर लावण्याचे आमिष दाखवून २ जणांची फसवणूक करण्यात आली आहे. सायबर आणि आíथक गुन्ह्यांचा वाढता आलेख ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे अशा फसव्या योजनांपासून नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
आíथक गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने देणाऱ्या कंपन्यांपासून सावध राहण्याचा सल्ला अलिबाग पोलिसांनी दिला आहे. बनावट कंपन्यांच्या नावांनी वेगवेगळ्या एजंट्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षति केले जाते आहे. यात दुप्पट आणि तिप्पट मोबदला देणाऱ्या स्कीम्सचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला रायगडच्या आíथक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख प्रदीप बडाख यांनी दिला आहे.