शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास अक्कलकोट रस्त्यावरील शांती चौकाजवळ एका मालमोटारीची पाठीमागून दुचाकीला धडक बसून असद अल्ताफ बागवान (वय ३, रा. कर्जाळ, ता. अक्कलकोट) या चिमुकल्या मुलाचा आजी-आजोबांच्या डोळ्यांदेखत जीव गेला. असद हा आजी-आजोबांसोबत दुचाकीवर बसून कर्जाळ येथून सोलापूरकडे आला होता. शांती चौकाजवळ वळण घेऊन पुढे जात असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका मालमोटारीने ठोकरले. यात कोवळा असद आणि त्याची आजी मुमताज सरदार बागवान (वय ४५) हे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. यात मालमोटारीचे पाठीमागील चाक छोट्या असदच्या डोक्यावरून गेल्यामुळे तो जागीच मृत झाला. तर आजी मुमताज गंभीर जखमी झाली. या जड वाहतुकीने बळी घेतलेल्या या दुर्घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त करीत, पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या २२ जानेवारी रोजी जुना पुणे नाका येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ एका डंपरने जोरात धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात आई आणि बहिणीच्या डोळ्यांसमोर श्रीपाद पवन कवडे (रा. हुतात्मा शिंदे चौक, दक्षिण कसबा, सोलापूर) या बालकाचा बळी गेला होता. आई आणि बहिणीसोबत दुचाकीवर बसून बाळे येथून घराकडे परत येत असताना जड वाहतुकीने श्रीपादचा जागीच बळी घेतला होता. या दुर्घटनेमुळे त्याच्या पालकांसह कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing casualties of heavy traffic in solapur amy
First published on: 27-01-2023 at 19:58 IST