कर्नाटक मलपी येथील काही बोटी रत्नागिरी जवळील पावस गोळप येथील समुद्रकिनारी मासेमारी करत असल्याचे आढळून आले. यावेळी तात्काळ मत्स्य विभागाची गस्ती बोट तिथे गेली. मात्र, घुसखोरी करून मासेमारी करणाऱ्या बोटीने रस्सी टाकून गस्तीनौकेचा पंखा बंद पाडला, त्यामुळे गस्ती नौकेवरील कर्मचाऱ्यांनी  त्या परिसरातील मच्छीमारांशी संपर्क साधून तात्काळ समुद्रात या मलपी बोटीचा पाठलाग करण्यास सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीतल्या बोटी जमा झाल्याने कर्नाटक मलपीच्या एका बोटीला घेरण्यात यश आले.

हेही वाचा >>> Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

इतर काही बोटींनी येथून पळ काढला. पकडण्यात आलेल्या बोटीवरील सात जणांना पकडण्यात मत्स्य विभागाला यश आले आहे. मात्र, पकडलेल्या खलाश्यांनी मत्स्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक मच्छीमारांनी जीवावर उदार होऊन मलपी बोट पकडून या खलाश्यांना गस्ती बोटीच्या कर्मचाऱ्यांच्या हवाली केले. गुरुवारी मध्यरात्री मलपी येथील ३५-४० हायस्पीड ट्रॉलर नौका या भागात निदर्शनास आल्या होत्या.

हेही वाचा >>> Mumbai Highcourt : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मुंबई उच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली

या नौकांचा पाठलाग करत असता नौका “अधिरा” आयएनडी – के एल -०२ एम एम ५७२४ या नौकेचा ताबा घेताना इतर नौकांनी गस्ती नौका घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच पकडलेल्या नौकांवरील खलाशांनी गस्ती नौकेवरील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थितीचे गांभीर्य पाहून नौकेवरील कर्मचाऱ्यांनी ही बाब सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या निदर्शनास आणली. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क करून अतिरिक्त पोलिस बळ उपलब्ध करून मिरकरवाडा येथील नौकेवरून पाठवण्यात आले. यावेळी स्थानिक नौकांची मदत आणि अतिरिक्त पोलिसांची कुमक या सर्व प्रसंगावधान बाबींमुळे पकडलेली नौका तसेच गस्ती नौका टोईंग करून मिरकरवाडा बंदरात आणण्यात  आल्या. पकडलेल्या नौकेवर म.सा. मा. नि. अ. १९८१ अंतर्गत दावा दाखल करण्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली.