केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात देशाच्या सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीचे प्रमाण कमालीचे घटले आहे. त्याचे श्रेय संपुआ सरकारला असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. या मेळाव्याच्या माध्यमातून शिंदे यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे मानले जाते. या वेळी उज्ज्वला शिंदे यांच्यासह आमदार दिलीप माने, माजी मंत्री आनंदराव देवकते, सिद्धाराम म्हेत्रे, वळसंगच्या स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, राज्य भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत घोडके, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश हसापुरे, गोपाळराव कोरे आदींची उपस्थिती होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी स्वागत केले.
विशेषत: पाकिस्तान व चीनच्या सीमेकडून होणारी घुसखोरी ७० टक्के घटल्याचा दावा शिंदे यांनी केला. तसेच घुसखोरीबरोबरच देशातील जातीय दंगलींचे प्रमाण घटल्याचाही ते म्हणाल़े