नगर : जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना दिले जाणारे विविध परवाने, सेवासुविधांची माहिती आता मोबाइलवरील ‘ओटीपी’द्वारेही समजू शकणार आहे. या कार्यप्रणालीचे उद्घाटन आज, मंगळवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. मुश्रीफ यांनी गेल्यावर्षी पोलिसांच्या ई-टपाल सेवेचे उद्घाटन केले होते. त्याचाच पुढचा टप्पा आता सुरू करण्यात आला आहे. राज्यात प्रथमच अशीच सुविधा सुरू करण्यात आली आहे.  यासंदर्भात माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले की, पोलिसांकडून नागरिकांना पारपत्र अर्ज, सशुल्क बंदोबस्त, चारित्र्य पडताळणी, पेट्रोल पंप, सुरक्षारक्षक एजन्सी, शस्त्र परवाना, स्फोटके परवाना, वाईन शॉप-परमीटरूम यासह विविध परवाने दिले जातात. यापूर्वी सुरू केलेली ई टपाल कार्यप्रणाली जिल्हा पोलिस दलाच्या वेबसाईटला जोडण्यात आली आहे. नागरिकांनी या वेबसाईटवर ई टपाल टॅब ओपन करावा, आपल्या अर्जातील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक त्यात समाविष्ट करावा, अर्जदारांना त्यांच्या मोबाइलवर आलेला ‘ओटीपी’ त्यात समाविष्ट करावा, नागरिकांना त्यावर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर केलेले सर्व अर्ज दिसतील, त्यातील आवश्यक असलेल्या अर्जावर क्लिक केल्यास त्या अर्जाबाबतची अद्ययावत माहिती नागरिकांना घरबसल्या प्राप्त होणार आहे. ही सेवा नि:शुल्क पुरवली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संगणकीय कार्यप्रणालीच्या माध्यमातून कार्यालयीन पत्र व टपाल एका कार्यालयाकडून दुसऱ्या कार्यालयाकडे ऑनलाइन पद्धतीने पाठवले जाते, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीचे त्वरित निरसन होण्यास मदत झाली असून पोलिसांचे कामकाज पारदर्शक व कार्यक्षम होण्यास मदत झाल्याचा दावा पाटील यांनी केला. उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त शंकर गोरे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information licenses facilities obtained police otp ysh
First published on: 26-01-2022 at 00:02 IST