राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शाईफेकण्याची घटना संगमनेर तालुक्यात राजापूर येथे घडली.
एका कार्यक्रमानंतर थोरात हे गाडीत बसत असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. त्यांच्यावर शाई फेकणाऱ्याला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. शाई फेकणारा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.