मराठा विद्या प्रसारक समाज संस्था पुढील वर्षी शंभराव्या वर्षांत पदार्पण करीत असल्याने त्यानिमित्त आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येईल, असा मनोदय संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी जाहीर केला. मविप्रच्या वतीने तीन जानेवारी रोजी पाचव्या ‘मविप्र मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेच्या धावमार्ग मापनाची सुरुवात मंगळवारी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी पवार बोलत होत्या.
याप्रसंगी संस्थेच्या संचालक नाना महाले, भाऊसाहेब पाटील, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. किशोर पवार आदी उपस्थित होते. गंगापूररोडवरील मविप्र मॅरेथॉन चौकात कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहाजवळ कलशपूजन करून धावपट्टी मापनास सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचे अंतर ‘कॅलिब्रेटेड बायसिकल व्हील’ पद्धतीने मोजण्यात येणार आहे. ही जबाबदारी स्पर्धेचे तांत्रिक समितीप्रमुख प्रा. हेमंत पाटील यांच्या पथकावर सोपविण्यात आली आहे. गतवर्षी चंद्रपूरच्या नीलेश बोंडेने दोन तास २९ मिनिटे सात सेकंद अशा वेळेत ही स्पर्धा जिंकत स्पर्धाविक्रम केला होता.
वयोगटानुसार कमी-अधिक अंतराची स्पर्धा मविप्र १५ वर्षांपासून घेत असली तरी मॅरेथॉन स्पर्धेला चार वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचा मार्ग मविप्र मॅरेथॉन चौक कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह ते धोंडेगावपर्यंत व परत मविप्र मॅरेथॉन चौक असा आहे. या वेळी जिल्हा अॅथलेटिक संघटनेचे सचिव हेमंत पांडे, प्रा. हेमंत पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन नीलिमा पवार यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2012 रोजी प्रकाशित
मविप्रतर्फे पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन
मराठा विद्या प्रसारक समाज संस्था पुढील वर्षी शंभराव्या वर्षांत पदार्पण करीत असल्याने त्यानिमित्त आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येईल, असा मनोदय संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी जाहीर केला.
First published on: 05-12-2012 at 06:07 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International marathon by mvps